Sara Tendulkar with Sachin | सचिनने लेक सारा तेंडुलकर सोबतचा जुना फोटो केला पोस्ट; Sourav Ganguly कमेंट करत म्हणाला...

सारा नेहमी ग्लॅमरस लूकमुळे असते चर्चेत

Sara Tendulkar with Sachin Throwback Photo | भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. सचिन IPL मध्ये मुंबई इंडियन्सचा मेंटॉर म्हणून काम पाहत होता. IPL नंतर तो मोकळा वेळ एन्जॉय करत आहे.

सचिनची लेक सारा नेहमी तिच्या बोल्ड अँड बिनधास्त फोटोंमुळे चर्चेत असते. पण सचिन तेंडुलकरने आपल्या इंस्टाग्रामवर सारासोबतचा एक क्यूट फोटो शेअर केला आहे.

सचिन तेंडुलकरने सारासोबतचा स्वतःचा थ्रो बॅक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये सारा तेंडुलकर खूपच लहान आहे.

सचिनने या गोंडस छायाचित्रासोबत कॅप्शन दिले आहे की, हा असा फोटो आहे जो माझ्या सर्व आनंदांची कहाणी सांगतो आणि आनंदाचे क्षण कॅमेऱ्यात कैद करतो.

सचिन आणि साराचा हा फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. सारा तेंडुलकरनेही या फोटोवर कमेंट करत लव्ह यू असे लिहिले आहे.

सचिनचा मित्र आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यानेही या फोटोवर कमेंट केली आहे. सौरव गांगुलीने लिहिले आहे की, 'सचिन.. हा खरंच अप्रतिम फोटो आहे.'