सारा तेंडुलकरनं शेअर केली 'स्पेशल डेट'ची स्टोरी; कोण आहे ती व्यक्ती?

सारा तेंडुलकरची इन्स्टास्टोरी चर्चेत, कोण आहे तिच्या आयुष्यातील खास व्यक्ती जाणून घ्या सविस्तर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या आयुष्यातील काही खास क्षण ती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करतानाही पाहायला मिळते.

लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक असलेल्या सारा तेंडुलकरच्या प्रत्येक पोस्टवर लाइक्स अन् कमेंट्सची 'बरसात' होताना पाहायला मिळते.

छोट्या छोट्या गोष्टींतून आनंद घेणाऱ्या साराचा वेगवेगळ्या लूकमधील अंदाज तिच्या चाहत्यांना घायाळ करून सोडणारा असतो.

आता तिने खास व्यक्तीसोबतच्या स्पेशल डेटची गोष्ट शेअर केली आहे. आता साराच्या आयुष्यातील ती खास व्यक्ती कोण? तेच आपण जाणून घेऊयात.

सारा तेंडुलकरनं जो फोटो शेअर केल्या त्या फोटोत तिच्यासोबत दिसणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ती तिची आजी (आई अंजलीची आई) आहे.

सारा तेंडुलकरची याआधीही आजीवरील प्रेम व्यक्त करताना तिच्यासोबतचे खास फोटो शेअर केले आहेत. एवढेच काय आजीच्या डायरीतील खास क्षणही तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केल्याचे पाहायला मिळाले होते.

साराची आजी लंडनमध्ये वास्तव्यास असते. तिच्या आजीनं गोतावळ्यातील खास क्षण जपणारा एक खास फोटो अल्बमच तयार केला आहे. त्यातील हा एक क्षणही सारानं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केला होता.