IPL 2022, Sanju Samson: टॉपच्या अभिनेत्रींपेक्षा सुंदर आहे संजू सॅमसनची पत्नी, फेसबूकवरून सुरू झाली होती लव्हस्टोरी

Sanju Samson's wife: राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनसाठी आयपीएल २०२२ चा हंगाम अविस्मरणीय ठरला आहे. त्याने केवळ कर्णधार म्हणूनच नाही तर फलंदाज म्हणून जबरदस्त कामगिरी केली आहे. संजूच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचे झाल्यास २७ वर्षीय संजू सॅमसनने त्याची कॉलेजमधील मैत्रिण Charulatha Samson हिच्यासोबत विवाह केला आहे. मात्र या दोघांच्या लव्हस्टोरीबाबत फारच कमी लोकांना माहिती आहे.

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनसाठी आयपीएल २०२२ चा हंगाम अविस्मरणीय ठरला आहे. त्याने केवळ कर्णधार म्हणूनच नाही तर फलंदाज म्हणून जबरदस्त कामगिरी केली आहे. संजूच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचे झाल्यास २७ वर्षीय संजू सॅमसनने त्याची कॉलेजमधील मैत्रिण चारुलता हिच्यासोबत विवाह केला आहे. मात्र या दोघांच्या लव्हस्टोरीबाबत फारच कमी लोकांना माहिती आहे.

चारुलता केरळमधील तिरुवनंतपुरम येथील रहिवासी आहे. चारुलता कॉलेजमध्ये संजू सॅमसनची क्लासमेट होती. संजू आणि चारुलता यांनी तिरुवनंतपुरममधील कॉलेजमधून एकत्र शिक्षण घेतले होते.

संजू सॅमसनने फेसबूकवर चारुलताला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. तेव्हापासूनच त्यांची लव्हस्टोरी सुरू झाली होती. त्यानंतर त्यांनी आपली इच्छा कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर कुटुंबीयांनी दोघांचेही धुमधडाक्यात लग्न लावून दिले.

५ वर्षांपर्यंत रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर २२ डिसेंबर २०१८ रोजी दोघांनीही लग्न केलं. संजू सॅमसन ख्रिश्चन आहे. तर चारुलता हिंदू नायर आहे. दोघांचाही विवाह कोवलम शहरात झाला. कुटुंबातील मोजकेच लोक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते.

संजू सॅमसनची पत्नी सौंदर्याच्या बाबतीत कुठल्याही अभिनेत्रीपेक्षा सुंदर आहे. तिने शालेय शिक्षण तिरुवनंतपुरममधूनच पूर्ण केले आहे. तर मार इवानियोस कॉलेजमधून रसायन विज्ञान विषयाची पदवी घेतली होती. संजूने याच कॉलेजमधून बीएची पदवी मिळवली होती.

आयपीएल २०२२ मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी संजू सॅमसनने कप्तानीची चुणूक दाखवली आहे. संजूच्या नेतृत्वाखाली राजस्थानचा संघ १४ वर्षांनंतर आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यात यशस्वी ठरला आहे. संजूने यंदाच्या आयपीएलमध्ये १६ सामन्यात ४४४ धावा फटकावल्या आहेत.