मुकेश अंबानींपेक्षा मोठे घर; संपत्तीत विराट, सचिन, धोनीलाही मागे टाकतो 'हा' माजी क्रिकेटर

आम्ही ज्या क्रिकेटपटूंबद्दल बोलत आहोत, त्यांच्यासमोर सचिन, विराट, धोनीची संपत्ती काहीच नाही.

भारताचे आजी-माजी क्रिकेटर त्यांच्या संपत्तीमुळे अनेकदा चर्चेत येतात. कमाईच्या बाबतीत टॉपवर असलेल्या खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर, एमएस धोनी आणि विराट कोहलीची नेहमी चर्चा होत असते. या तिघांकडे 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्तीची संपत्ती असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात येतो. पण, भारतात आणखी एक क्रिकेटर आहे, जो संपत्तीच्या बाबतीत कोहली, सचिन आणि धोनीलाही मागे टाकू शकतो. विशेष म्हणजे, दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरापेक्षा त्या क्रिकेटरचे घर मोठे आहे.

आम्ही ज्या माजी क्रिकेटपटूबद्दल बोलत आहोत, त्यांचे नाव समरजित सिंग रणजित सिंग गायकवाड आहे. समरजितसिंग रणजितसिंग गायकवाड, यांचा राजघराण्याशी संबंध असून, 25 एप्रिल 1967 रोजी जन्मलेले समरजित सिंग गायकवाड हे गुजरातमधील बडोद्याचे राजे राहिले आहेत. ते माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू असून त्यांनी रणजी ट्रॉफीमध्ये बडोद्याचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी सहा प्रथम श्रेणी सामनेही खेळले असून, बडोदा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.

लक्ष्मी विलास पॅलेसचे मालक- समरजितसिंह गायकवाड हे रणजितसिंह प्रतापसिंह गायकवाड आणि शुभांगिनी राजे यांचे एकुलते एक सुपुत्र आहेत. 2012 मध्ये वडिलांच्या निधनानंतर त्यांनी महाराजांची गादी स्वीकारली. समरजितसिंह गायकवाड हे जगातील सर्वात मोठे खाजगी निवासस्थान असलेल्या लक्ष्मी विलास पॅलेसचे मालक आहेत. हा पॅलेस ब्रिटनचे राजघराणे राहत असलेल्या बकिंगहॅम पॅलेसपेक्षा चारपट मोठा आहे. समरजितसिंह गायकवाड यांचा विवाह राधिका राजे यांच्याशी झाला असून, त्या वांकानेरच्या राजघराण्यातील आहेत.

राजवाडा 1890 मध्ये बांधण्यात आला- हाउसिंग डॉट कॉमच्या मते, लक्ष्मी विलास पॅलेस 3,04,92,000 चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेला आहे. मुकेश अंबानींचे अँटिलिया 48,7800 स्क्वेअर फूट क्षेत्रफळात पसरले आहे. लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये 170 हून अधिक खोल्या आहेत. बकिंगहॅम पॅलेस 828,821 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आहे.

लक्ष्मी विलास पॅलेस हे महाराजा सयाजीराव गायकवाड तिसरे, यांनी 1890 साली बांधला होता. या आलिशान पॅलेसमध्ये गोल्फ कोर्सही आहे. समरजित सिंग यांची संपत्ती इतर क्रिकेटपटूंपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. त्यांच्या मालमत्तेचे मूल्य 20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. समरजितसिंह गुजरात आणि बनारसमधील सुमारे 17 मंदिरांच्या ट्रस्टमध्ये पर्यवेक्षकाची भूमिका देखील बजावतात.

विराट कोहलीची कमाई- विराट कोहली सध्या जगातील श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे. कोहलीला बीसीसीआयच्या करारानुसार A+ श्रेणी मिळाली असून, त्याला बोर्डाकडून वर्षाला 7 कोटी रुपये मिळतात. याशिवाय प्रत्येक कसोटी सामन्याची फी 15 लाख रुपये, एकदिवसीय सामन्याची फी 6 लाख रुपये आणि टी-20 सामन्याची फी 3 लाख रुपये आहे. कोहली त्याच्या आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून दरवर्षी 15 कोटी रुपये कमावतो. याशिवाय तो जाहिरातीमधूनही बरीच कमाई करतो.

सचिन-धोनीची मालमत्ता- अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारताचा माजी सलामीवीर सचिन तेंडुलकरच्या एकूण मालमत्तेबद्दल बोलायचे झाले तर सचिनकडे जवळपास 1,250 कोटी रुपये आहे. तसेच, माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीची एकूण मालमत्ता अंदाजे 1,040 रुपये आहे. सचिन आणि धोनी आजही जाहिराती आणि गुंतवणूकीतून वर्षाला करोडो रुपये कमावतात.