Join us  

Sachin Tendulkar : सचिनचे अर्धशतक, युवराजची आतषबाजी; लाराची वादळी खेळी अन् ४० षटकांत ४२४ धावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 3:00 PM

Open in App
1 / 11

सचिन तेंडुलकरनचे ( Sachin Tendulkar) अर्धशतक, युवराज सिंग ( Yuvraj Singh) याची चौकार-षटकारांची आतषबाजी अन् त्यांना दिग्गज फलंदाज ब्रायन लाराकडून ( Brian Lara) मिळालेलं सडेतोड उत्तर, हा दमदार खेळ पाहताना सर्व क्रिकेट चाहते जुन्या काळात नक्की गेले असतील.

2 / 11

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारतीय संघानं १२ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात ४० षटकांत दोन्ही संघांनी मिळून ४२४ धावा चोपल्या. त्यात २१ षटकार व ३६ चौकारांची आतषबाजी झाली.

3 / 11

प्रथम फलंदाजी करताना वीरेंद्र सेहवाग व सचिन तेंडुलकर यांनी भारतीय संघाला ५६ धावांची सलामी दिली. वीरू १७ चेंडूंत ५ चौकार व १ षटकार मारून ३५ धावांत माघारी परतला. मोहम्मद कैफनेही २१ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह २७ धावा केल्या.

4 / 11

सचिन तेंडुलकरनं सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले. त्यानं ४२ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ६५ धावांची खेळी केली. यूसूफ पठाणनं २० चेंडूंत ३७ धावा कुटल्या.

5 / 11

युवराजची बॅट पुन्हा तळपली आणि त्यानं २० चेंडूंत १ चौकार व ६ षटकारासह नाबाद ४९ धावा चोपल्या आणि भारतीय संघानं २० षटकांत ३ बाद २१८ धावांचा डोंगर उभा केला.

6 / 11

वेस्ट इंडिजकडून सडेतोड उत्तर मिळाले. ड्वेन स्मिथनं ३६ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह ६३ धावा, तर नरसिंग देवनरीननं ४४ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५९ धावा केल्या.

7 / 11

कर्णधार ब्रायन लारानं २८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४६ धावांची वादळी खेळी केली. पण, विंडीज संघाला ६ बाद २०६ धावांपर्यंत मजल मारता आली.

8 / 11

मनप्रीत गोनी, विनय कुमार आणि इरफान पठाणने शेवटच्या तीन षटकांत टिच्चून मारा करत भारताला रोमांचक विजय मिळवून दिला. या विजयासह भारतीय संघ रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.

9 / 11

10 / 11

11 / 11

या सामन्यात २० चेंडूत नाबाद ४९ धावा कुटणाऱ्या युवराज सिंगने महेंद्र नागामुटूने टाकलेल्या डावातील १९ व्या षटकात चार षटकार ठोकले. त्याने षटकातील पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि पाचव्या चेंडूवर षटकार ठोकला. या खेळीदरम्यान युवीने सात चेंडूत पाच वेळा चेंडूला सीमारेषेपार भिरकावले.

टॅग्स :सचिन तेंडुलकरयुवराज सिंगयुसुफ पठाणविरेंद्र सेहवाग