HappyBirthdaySachin : हिटमॅन रोहितनं सांगितले सचिनसोबतचे 'पाच' सर्वोत्तम क्षण!

भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मानं महान फलंदाज सचिन तेंडुलकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यानं सचिनसोबतचे पाच सर्वोत्तम क्षण जाहीर केले.

रोहित म्हणाला,'' वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा. आजचा दिवस आनंददायी गेला असेल अशी आशा करतो.'' यावेळी रोहितनं मास्टर ब्लास्टरसोबतचे पाच सर्वोत्तम क्षण सांगितले.

पहिला - ऑस्ट्रेलियाविरुद्ध CB सीरीजच्या ( 2008) अंतिम सामन्यातील मॅच विनिंग भागीदारी.... 240 धावांचा पाठलाग करताना सचिननं 117 धावा केल्या होत्या, तर रोहितनं पाचव्या क्रमांकावर येताना 66 चेंडूंत 87 धावा कुटल्या होत्या.

दुसरा - इडन गार्डनवर कसोटी संघाची कॅप सचिनच्या हस्ते रोहितला देण्यात आली होती. वेस्ट इंडिजविरुद्ध 2013मध्ये रोहितनं कसोटीत पदार्पण केलं होतं.

तिसरा - मुंबई इंडियन्ससाठी इंडियन प्रीमिअर लीग आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20चे जेतेपद

चौथा- सचिनच्या कसोटी कारकिर्दीच्या शेवटच्या दोन सामन्यांत खेळण्याची मिळालेली संधी

पाचवा - 100 आंतरराष्ट्रीय शतकाचा साक्षीदार बनण्याचा क्षण