Ritika Comment on Suryakumar Instagram Post: रितिका सूर्यकुमारला म्हणाली, 'रोहितला एक मिठी मार'; सूर्याने पाहा काय दिलं उत्तर

रोहित शर्मा सध्या बंगळुरूमध्ये दुखापतीतून सावरण्यासाठी उपचार घेत आहे. या दरम्यान सूर्यकुमार यादव वनडे मालिकेसाठी आफ्रिकेला रवाना होण्याआधी रोहितला भेटून गेला.

Ritika Comment on Suryakumar Instagram Post: भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या बंगळुरूमध्ये आहे. बंगळुरूत असताना सूर्यकुमार यादव चिन्नास्वामी स्टेडियममध्ये जाऊन भारत आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याला भेटला.

सूर्यकुमार यादव दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या वन डे मालिकेसाठी लवकरच रवाना होणार आहे. १८ जणांच्या संघात त्याला निवडण्यात आले आहे. १९ जानेवारीपासून वन डे मालिकेला सुरूवात होणार आहे.

या मालिकेआधी सूर्यकुमार रोहित शर्माला भेटला आणि त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो पोस्ट केला. दोघांच्या एकत्र फोटोला मोठ्या प्रमाणावर लाईक्स मिळाले.

रोहित आणि रितिका जवळपास सर्वच ठिकाणी क्रिकेट दौऱ्यावर एकत्र असतात. पण सध्या मात्र रोहित दुखापतीतून सावरण्यासाठी उपचार घेत आहे. त्यामुळे रोहित एकटाच चिन्नस्वामी स्टेडियममध्ये आहे.

रोहित आणि सूर्याचा हा फोटो पाहताच रोहितची पत्नी रितिका हिने त्यावर कमेंट केली. रोहितला माझ्या वतीने एक मिठी मार, अशी विनंतीच तिने कमेंट बॉक्समध्ये केली.

रितिकाच्या या विनंतीनंतर काही वेळातच सूर्यकुमारनेही तिला उत्तरही दिलं. रोहितची मी गळाभेट घेत त्याला मिठी मारल्याचं त्याने गमतीशीर पद्धतीने सांगितलं.