Rohit Sharma Diet Plan : रोहित शर्माचा नवीन लूक, दहा किलो वजन घटवले; 'हिटमॅन'चा डाएट प्लान आला समोर

Rohit Sharma Diet Plan : टी-२० आंतरराष्ट्रीय आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर आणि आता एकदिवसीय संघाच्या कर्णधारपद सोडल्यानंतर सर्वांच्या नजरा रोहित शर्मावर होत्या. काल एका कार्यक्रमात पहिल्यांदाच रोहित शर्माने हजेरी लावली.

भारतीय क्रिकेट संघात बीसीसीआयने मोठे बदल केले आहेत. रोहित शर्मा याच्याकडून आता एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून घेतले आहे. कर्णधारपद गेल्यानंतर सर्वांच्या नजरा रोहित शर्मावर आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहितची एकदिवसीय संघात निवड झाली आहे, पण कर्णधारपद शुभमन गिलकडे देण्यात आले आहे.

एकदिवसीय कर्णधारपद गेल्यानंतर ३८ वर्षीय रोहित शर्मा पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात दिसला. रोहितचा नवीन लूक पाहून अनेकांना धक्का बसला.

रोहित गेल्या अनेक महिन्यांपासून त्याच्या फिटनेसवर काम सुरू केले आहे. त्याने १० किलो वजनही कमी केले आहे. त्याच्या ट्रान्सफॉरमेशनने चाहते उत्साहित आहेत. अनेकांनी त्याचा डाएट प्लान संदर्भात चर्चा केली.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित शर्मा सकाळी ७ वाजता उठतो आणि सहा भिजवलेले बदाम, सॅलड आणि ज्यूस पितो.

सकाळी ७:०० वाजता: ६ भिजवलेले बदाम, कोशिंबीर, ताजा ज्यूस आणि सकाळी ९:३० वाजता (नाश्ता): फळांसह ओट्स, एक ग्लास दूध तसेच सकाळी ११:३० वाजता: दही, चिल्ला, नारळ पाणी.

दुपारी १:३० वाजता: भाजीपाला करी, डाळ, भात, कोशिंबीर आणि दुपारी ४:३० वाजता: फ्रूट स्मूदी, सुकामेवा असे घेतो. सायंकाळी ७:३० वाजता : पनीर, पुलाव, भाजीपाला सूपसह भाज्या आणि रात्री ९:३० वाजता: एक ग्लास दूध, मिक्स्ड नट्स असे खातो.

काही दिवसांपूर्वी, रोहित शर्मा जिममध्ये सराव करताना दिसला. अभिषेक नायरने त्याचा एक फोटो शेअर करत लिहिले, "१०,००० ग्रॅम वजन कमी केल्यानंतर, आपण सतत प्रयत्न करत राहू." या फोटोमध्ये रोहित पूर्वीपेक्षा खूपच फिट दिसत आहे.

आता, मंगळवारी सीएट क्रिकेट पुरस्कार सोहळ्यात रोहितला पाहून चाहते थक्क झाले. त्याने १० किलो वजन कमी केले आहे.