Join us  

IND vs ENG, 2nd Test : जे कुणालाच जमलं नाही ते रोहित शर्मानं करून दाखवलं; हा विक्रम कुणाला जमणार पण नाही!

By स्वदेश घाणेकर | Published: February 13, 2021 2:14 PM

Open in App
1 / 10

कोरोना व्हायरसच्या संकटामुळे प्रेक्षकांना स्टेडियमवर येण्याची परवानगी नव्हती, परंतु जवळपास एका वर्षानंतर क्रिकेट स्टेडियमवर प्रेक्षक परतले आणि रोहितनं त्यांचं शतकानं स्वागत केलं. या शतकासह रोहितनं आतापर्यंत कुणालाच न जमलेला विक्रम नावावर केला.

2 / 10

शुबमन गिल दुसऱ्याच षटकात माघारी परतल्यानंतर रोहित शर्मानं दुसऱ्या विकेटसाठी चेतेश्वर पुजारासह 85 धावांची भागीदारी करून टीम इंडियाला ट्रॅकवर आणले. पण, पुजारा ( 21) धावांवर माघारी परतला. हा धक्का कमी होता की काय कर्णधार विराट कोहलीही ( Virat Kohli) शून्यावर माघारी परतला.

3 / 10

रोहितनं सामन्याची सूत्र हाती घेताना उपकर्णधार अजिंक्य रहाणेसह शतकी भागीदारी केली. रोहित शर्मानं 130 चेंडूंत 14 चौकार व 2 षटकारांसह शतक पूर्ण केले. कसोटी क्रिकेटमधील त्याचे हे सातवे शतक ठरलं.

4 / 10

घरच्या मैदानावर सातही कसोटी शतकं करणारा रोहित हा पहिलाच भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी मोहम्मद अझरुद्दीन यानं 6 शतकं घरच्या मैदानावर केली होती.

5 / 10

रोहित शर्माला गेल्या ८ कसोटी सामन्यांमध्ये एकही शतक ठोकता आलेलं नव्हतं. रोहितनं ऑक्टोबर २०१९ मध्ये रांची कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २१२ धावांची खेळी साकारली होती.

6 / 10

तीनही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या भारतीय सलामीवीरांमध्ये रोहित तिसऱ्या क्रमांकावर आहे. ( Most centuries by Indian openers across formats). सचिन तेंडुलकर ( 45), वीरेंद्र सेहवाग ( 36), रोहित शर्मा ( 35), सुनील गावस्कर ( 34) व शिखर धवन ( 24) अशी ही यादी आहे.

7 / 10

ऑक्टोबर 2019नंतर रोहितनं कसोटीत सलामीला खेळणं सुरुवात केलं आणि त्यानंतर सलामीवीर म्हणून सर्वाधिक 4 शतकं करणारा तो पहिलाच फलंदाज आहे.

8 / 10

इंग्लंडविरुद्धचे रोहितचे हे पहिलेच कसोटी शतक ठरले आणि त्यानं ख्रिस गेलच्या विक्रमाशी बरोबरी केली. ( Players to score a century against England in Tests, ODIs and T20Is). इंग्लंडविरुद्ध कसोटी, वन डे व ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावणारा रोहित हा गेलनंतर दुसरा फलंदाज ठरला.

9 / 10

रोहितनं फक्त इंग्लंडविरुद्धच नव्हे तर वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका या संघांविरुद्धही तीनही फॉरमॅटमध्ये शतक झळकावलं आहे. चार संघांविरुद्ध असा पराक्रम करणारा रोहित हा जगातील एकमेव फलंदाज ठरला आहे.

10 / 10

गेल्या ४८१ दिवसांमध्ये रोहित शर्माला कसोटी क्रिकेटमध्ये एकही शतक साकारता आलेलं नाही. रोहित शर्माने २०१३ साली वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताच्या कसोटी संघात पदार्पण केलं होतं. आपल्या पहिल्या दोन्ही कसोटींमध्ये रोहितने शतकं ठोकली होती.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरोहित शर्माख्रिस गेलसचिन तेंडुलकरविरेंद्र सेहवागसुनील गावसकर