Join us

रवींद्र जडेजामुळे गेला असता रोहित शर्मा व अजिंक्य रहाणेचा जीव; हिटमॅनचा धक्कादायक खुलासा

By स्वदेश घाणेकर | Updated: December 21, 2020 16:56 IST

Open in App
1 / 8

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा ( Ravindra Jajeja) चा स्वभाव किती मस्तीखोर आहे हे सर्वांनाच माहित आहे. मैदानावर आणि मैदानाबाहेर तो नेहमी मस्तीच्या मूडमध्ये पाहायला मिळतो.

2 / 8

पण, त्याची हीच मस्ती भारताचा सलामीवीर रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) यांच्या जीवावर बेतणारी ठरली असती. रोहितनं एका यू ट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केला.

3 / 8

रोहित आणि अजिंक्य यांनी या मुलाखतीत दक्षिण आफ्रिकेत घडलेला हा प्रसंग सांगितला. यात दोघंही आपल्या कुटुंबीयांसह जंगल सफारीवर गेले होते. रहाणेनं सांगितलं की,''मी आणि रोहित आपापल्या पत्नीसह जंगल सफारीवर गेलो होते आणि जडेजाही सोबत होता.''

4 / 8

तेथे ही सर्व मंडळी चीता वॉकिंग करायला गेली. दोन-तीन चित्यांसोबत वॉक करायची असेल, असे त्यांना वाटले, परंतु तेथे गेल्यावर काही वेगळाच नजारा दिसला. त्यांच्या जवळ २० ते २५ मीटरच्या अंतरावर दोन चिता शिकार खाण्यात व्यग्र होते.

5 / 8

तेव्हा रोहित म्हणाला की जडेजा सोबत जायला नको. तो खुपच क्रेजी आहे. चिता शिकार खात असतात तेव्हा त्यांना त्रास द्यायला नको, पण तेव्हा जडेजानं तेथे आरडोओरड करण्यास सुरूवात केली आणि तो चितांना बोलावत होता.

6 / 8

त्याच्या या कृतीमुळे चितानं त्यांच्या दिशेनं फिरला आणि एकटक पाहत राहिला. रोहितनं जडेजाला समजावण्याचा प्रयत्न केला. जंगलात असताना असं धाडस महागात पडले असते. त्यावेळी काय अवस्था होती, हे रोहितलाच माहित. त्यावेळी जडेजाला मारण्याची तीव्र इच्छा रोहितच्या मनात निर्माण झाली होती.

7 / 8

यापूर्वीही गीर अभयारण्यात सिंहासोबत घेतलेला फोटो चर्चेत आला होता.

8 / 8

टॅग्स :रवींद्र जडेजारोहित शर्माअजिंक्य रहाणेद. आफ्रिका