IPL 2025 : सर्वात कमी स्ट्राइक रेटसह धावा करणारे ५ फलंदाज

इथं एक नजर टाकुयात १०० पेक्षा अधिक चेंडू खेळल्यानंतर स्ट्राइक रेटमध्ये मागे पडलेल्या स्टार फलंदाजांवर...

आक्रमक बॅटिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या काही फलंदाजांना IPL च्या यंदाच्या हंगामात आपल्या भात्यातून फटकेबाजीचा धमाका दाखवून देण्यात अपयश आले आहे.

स्फोटक फलंदाजीच्या जोरावर २७ कोटींची ऐतिहासिक बोली लागलेल्या रिषभ पंतसह किलर खेळीसाठी ओळखल्या जाणाऱ्या मिलरचाही यात समावेश आहे.

इथं एक नजर टाकुयात १०० पेक्षा अधिक चेंडू खेळल्यानंतर स्ट्राइक रेटमध्ये मागे पडलेल्या स्टार फलंदाजांवर...

लखनौ सुपर जाएंट्सचे नेतृत्व करणाऱ्या रिषभ पंतने ११ सामन्यात १२.८ च्या सरासरीसह ९९.२२ च्या स्ट्राइक रेटनं फक्त १२८ धावा केल्या आहेत.

सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यातील नीतीश कुमार रेड्डी या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १० सामन्यात १२०.१४ च्या स्ट्राइक रेटनं १७३ धावा केल्या आहेत.

विल जॅक्स हा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून अष्टपैलू कामगिरी करताना दिसत आहे. पण तोही कमी स्ट्राइक रेट असणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आहे. १० सामन्यात १४२ धावा करणाऱ्या विल जॅक्सचे स्ट्राइक रेटन १२२.४१ इतके आहे.

लखनौ सुपर जाएंट्सच्या ताफ्यातील डेविड मिलरने ११ सामन्यात १५३ धावा केल्या आहेत. त्याचे स्ट्राइक रेट १७५.५ च्या घरात आहे.

CSK च्या डावाची सुरुवात करताना रचिन रविंद्रही अपयशी ठरला आहे. त्याने ८ सामन्यात ११८.१९ च्या सरासरीने १९१ धावा केल्या आहेत.