रिषभ पंतला मोठा डाव साधण्याची संधी; MS धोनीचा वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात!

ज्या मैदानातून कसोटीत पदार्पण केलं त्या मैदानात रिषभ पंत खास छाप सोडत नवा वर्ल्ड रेकॉर्ड सेट करणार का?

इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेत रिषभ पंतकडे उप कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आलीये.

भारत-इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढत मोठा डाव साधण्याची संधी रिषभ पंतकडे आहे.

रिषभ पंत याने २०१८ मध्ये इंग्लंडच्या मैदानातूनच कसोटी पदार्पण केले होते. आतापर्यंत त्याने इंग्लंडमध्ये ८ कसोटी सामन्यात दोन शतकासह ३४.०६ च्या सरासरीनं ५११ धावा केल्या आहेत. पाहुण्या संघाकडून विकेट किपर बॅटरच्या रुपात इंग्लंडच्या मैदानात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो नवव्या क्रमांकावर आहे.

पाहुण्या संघाकडून इंग्लंडच्या मैदानात विकेट किपर बॅटरच्या रुपात सर्वाधिक धावा करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड हा धोनीच्या नावे आहे. त्याने १२ कसोटी सामन्यात इंग्लंडमध्ये ८ अर्धशतकासह ७७८ धावा केल्या आहेत.

धोनीला मागे टाकण्यासाठी रिषभ पंतला इंग्लंड दौऱ्यावरील कसोटी सामन्यात अजून २६८ धावा कराव्या लागतील. जर त्याने हा डाव साधला तर ८ दिग्गजांना मागे टाकत इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करणारा विकेट किपर बॅटरच्या रुपात तो टॉपर ठरेल.

इंग्लंडच्या मैदानात ८०० धावा करणारा पहिला परदेशी विकेट किपर बॅटर होण्याची संधीही रिषभ पंतकडे आहे.

एका शतकी खेळीसह रिषभ पंत या बाबतीतही महेंद्रसिंह धोनीला मागे टाकू शकतो.