Join us  

Record Breaker : यशस्वी जैस्वालने १४७ वर्षांच्या कसोटी इतिहासात कधी न घडलेला विक्रम नोंदवला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 1:12 PM

Open in App
1 / 8

२३ वर्षीय यशस्वीने कसोटीत ३ वेळा १५० हून अधिक धावा केल्या आणि इतक्या कमी वयात हा पराक्रम करणारा तो भारताचा पहिला फलंदाज बनला. त्याने सचिन तेंडुलकर ( २) व विनोद कांबळी ( २) यांना मागे टाकले.

2 / 8

कसोटी कारकीर्दितील पहिल्या ३ शतकांचे १५०+धावांत रुपांतर करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. यापूर्वी जावेद मियाँदाद, अँड्य्रू जोन्स, ब्रायन लारा, माहेला जयवर्धने, मॅथ्यू सिनक्लेअर, ग्रॅमी स्मिथ यांनी हा पराक्रम केला आहे.

3 / 8

यशस्वी २२ वर्ष व ५२ दिवसांचा आहे आणि वयाच्या २४ वर्षांखालील एकापेक्षा जास्त १५०+ वेळा धावा केल्या. यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या ( २४ वर्ष व ३३६ दिवस) नावावर होता.

4 / 8

कसोटी क्रिकेटच्या एका इनिंग्जमध्ये १० षटकार खेचणारा यशस्वी दुसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी २०१६ मध्ये बेन स्टोक्सने वयाच्या २४ वर्षी व २१३ दिवसांचा असताना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हा पराक्रम केला होता. यसस्वी आज २२ वर्ष व ५२ दिवसांचा आहे.

5 / 8

कसोटी क्रिकेटच्या १४७ वर्षांच्या इतिहासात एका मालिकेत २० किंवा त्यापेक्षा जास्त षटकार खेचणारा यशस्वी पहिला फलंदाज ठरला. यापूर्वी हा विक्रम रोहित शर्मा ( १९ वि. दक्षिण आफ्रिका, २०१९) याच्या नावावर होता.

6 / 8

घरच्या मैदानावर झालेल्या कसोटी मालिकेत ५००+ धावा करणारा यशस्वी हा भारताचा सातवा सलामीवीर ठरला. या विक्रमात सुनील गावस्कर ( ७३२ वि. वेस्ट इंडिज, १९७८), वीरेंद्र सेहवाग ( ५४४ वि. पाकिस्तान, २००५), रोहित शर्मा ( ५२९ धावा वि. दक्षिण आफ्रिका, २०१९), एम मंकड ( ५२६ धावा वि. न्यूझीलंड, १९५५), बीके कंदेरन ( ५२५ वि. इंग्लंड १९६४) यांनी असा पराक्रम केला. यशस्वीने ५१७* धावा करून सुनील गावस्कर ( ५१४ धावा वि. पाकिस्तान, १९७९) यांचा विक्रम मोडला.

7 / 8

२२व्या वर्षी कसोटी मालिकेत भारताकडून ५००+ धावा करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला. सुनील गावस्कर यांनी १९७१ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध असा पराक्रम केला होता.

8 / 8

यशस्वीने २३१ चेंडूंत द्विशतक झळकावले आणि कसोटीतील भारताकडून झालेल हे पाचवे जलद द्विशतक ठरले. यापूर्वीचे चार जलद द्विशतक हे वीरेंद्र सेहवागने ( १६३ चेंडू वि. श्रीलंका) नोंदवली आहेत.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडयशस्वी जैस्वालविरेंद्र सेहवाग