Join us  

India vs England, 1st Test : आर अश्विननं आशियात केला पराक्रम; ५५.१ षटकं फेकून नोंदवला भारी विक्रम

By स्वदेश घाणेकर | Published: February 07, 2021 10:44 AM

Open in App
1 / 9

India vs England, 1st Test Day 3 : जो रुटच्या ( Joe Root) फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंडनं पहिल्या कसोटीत धावांचा डोंगर उभा केला आहे. चेन्नई कसोटीत भारतीय खेळाडूंकडून चुकांवर चुका झाल्या आणि त्याचा पुरेपूर फायदा इंग्लंड खेळाडूंनी उचलला. दुसऱ्या दिवसाच्या ८ बाद ५५५ धावांवरून इंग्लंडनं तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू केला.

2 / 9

नवीन चेंडू घेताच जसप्रीत बुमराहनं ( Jasprit Bumrah) भारताला विकेट मिळवून दिली, त्यानंतर आलेला जेम्स अँडरसनही लगेच माघारी परतला असता, परंतु यष्टिरक्षक रिषभ पंतनं ( Rishabh Pant) त्याचा यष्टिचीत करण्याची सोपी संधी गमावली. भारतानं इंग्लंडचा पहिला डाव ५७८ धावांवर गुंडाळला, परंतु अखेरच्या दोन विकेट्सनी ५३ धावांचे योगदान दिले.

3 / 9

इंग्लंडचा कर्णधार जो रूटनं ( Joe Root) पहिल्याच कसोटीत भारतीय गोलंदाजांना हतबल केलं. भारत दौऱ्यावर ( India vs England 1st Test) येण्यापूर्वी इंग्लंडनं श्रीलंकेचा दौरा केला आणि तेथेही दोन कसोटी सामन्यांत रुटनं २२८ व १८६ धावांची खेळी केली. तोच फॉर्म चेन्नई कसोटीत ( Chennai Test) कायम राखताना रुटनं ३७७ चेंडूंत १९ चौकार व २ षटकारांसह २१८ धावा कुटल्या. शाहबाज नदीमला त्याची विकेट घेण्यात यश मिळालं.

4 / 9

भारतीय कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) तीनही DRS चुकीचा निर्णय घेऊन गमावल्याचा फटका बसला. भारताने पहिल्या डावातील सर्व DRS दुसऱ्या सत्रातच गमावले होते. त्यात दोन झेल सुटले व एक सोपा रन आऊटही भारतीय क्षेत्ररक्षकांना करता आला नाही. रोहित शर्मानंही एक सोपा झेल सोडला. या सामन्यात रिषभ पंत यष्टिंमागे मनोरंजन करताना दिसला, परंतु त्याच्याकडून चुकाही झाल्या. पहिल्याच दिवशी दुसऱ्याच षटकात त्याच्याकडून झेल सुटला अन् आज तिसऱ्या दिवशी स्टम्पिंग...

5 / 9

इंग्लंडच्या ४ ते ८ क्रमांकाच्या प्रत्येक फलंदाजानं ३०+ धावा केल्या. भारतात भारताविरुद्ध प्रतिस्पर्धी संघानं हे असं तिसऱ्यांदा केलं. यापूर्वी १९४८ मध्ये दिल्ली कसोटीत वेस्ट इंडिजनं, तर २००५मध्ये मोहाली कसोटीत पाकिस्ताननं हा पराक्रम केला.

6 / 9

जसप्रीत बुमराह व आर अश्विन यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. इशांत शर्मा व शाहबाज नदीम यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले. इंग्लंडच्या संघानं १९०.१ षटकं खेळली. यापूर्वी २००९मध्ये भारतीय गोलंदाजांना श्रीलंकेविरुद्धच्या अहमदाबाद कसोटीत २०२.४ षटकं फेकावी लागली होती.

7 / 9

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या डावात ५७८ धावा करूनही एकदाच संघ पराभूत झाला आहे. यापूर्वी २०१७मध्ये वेलिंग्टन कसोटीत बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात पहिला डाव ८ बाद ५९५ धावांवर घोषित केला होता.

8 / 9

आर अश्विननं इंग्लंडचा अखेरचा फलंदाज जेम्स अँडरसनला बाद करून आशियात ३०० विकेट्स पूर्ण केल्या. अनिल कुंबळे व हरभजन सिंग यांच्यानंतर आशिया खंडात ३०० विकेट्स घेणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज आहे. मुथय्या मुरलीधरन ( ६१२), अनिल कुंबळे ( ४१९), रंगना हेरथ ( ३५४), आर अश्विन ( ३००*) आणि हरभजन सिंग ( ३००) यांनी आशिया खंडात सर्वाधिक विकेट्स घेतले आहेत.

9 / 9

या सामन्यात अश्विननं ५५.१ षटकं फेकली. कसोटीच्या एका डावात ही सर्वाधिक षटकं आहेत. यापूर्वी अश्विननं २०१२मध्ये अॅडलेड कसोटीत ५३ षटकं फेकली होती.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडआर अश्विनअनिल कुंबळेहरभजन सिंग