IPL 2025: फायनलआधी रजत पाटीदार आणि श्रेयस अय्यर यांचे ट्रॉफीसह फोटोशूट!

IPL 2025 Final: आरबीसी आणि पंजाब यांच्यात रविवारी आयपीएल २०२५ मधील अंतिम सामना खेळला जाणार आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि पंजाब किंग्ज यांच्यात आयपीएल २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना खेळला जाणार आहे.

या सामन्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदार आणि पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर यांनी आयपीएल ट्रॉफीसोबत फोटो काढले.

फोटोशूटमध्ये, दोन्ही कर्णधार आपपल्या संघाच्या जर्सीमध्ये एकमेकांशी हास्तांदोलन करताना दिसत आहेत. आयपीएल एक्सच्या अधिकृत हँडलने हे फोटो शेअर करण्यात आले.

क्वालिफायर १ मध्ये पीबीकेएसला हरवून आरसीबीने अंतिम फेरी गाठली. त्यानंतर क्वालिफायर २ मध्ये पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा पाच विकेट्सने पराभव करून जेतेपदाच्या लढतीत आपले स्थान पक्के केले.

आरसीबी आणि पंजाब पहिले आयपीएल जेतेपद जिंकण्यासाठी रविवारी मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे हा सामना रोमहर्षक होण्याची शक्यता आहे.