Photo : भारताच्या आणखी एका खेळाडूनं बांधली लगीनगाठ; त्याच्यापेक्षा दिसतोय नवरीचा राजेशाही थाट

राजस्थान रॉयल्स संघाचा फिरकीपटू श्रेयस गोपाळ ( Shreyas Gopal) बुधवारी लग्नबंधनात अडकला. श्रेयसनं निकिथा शिव ( Nikitha Shiv) हिच्याशी लग्न केलं.

राजस्थान रॉयल्स संघाचा फिरकीपटू श्रेयस गोपाळ ( Shreyas Gopal) बुधवारी लग्नबंधनात अडकला. श्रेयसनं निकिथा शिव ( Nikitha Shiv) हिच्याशी लग्न केलं.

कर्नाटकच्या गोलंदाजानं आयपीएलमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख तयार केली आहे. त्यानं ६४ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २६७४ धावा आणि १९१ विकेट्स घेतल्या आहेत.

लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्यानं ४७ सामन्यांत ७७ विकेट्स, तर ८२ ट्वेंटी-२० सामन्यांत ९१ विकेट्स त्याच्या नावावर आहेत. त्यानं तिनही फॉरमॅटमध्ये एका डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.

२०१४च्या आयपीएल ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सनं त्याला १० लाखांत आपल्या ताफ्यात घेतले होते. २०१३-१४च्या रणजी करंडक स्पर्धेत त्यानं २२ विकेट्स घेत कर्नाटकच्या जेतेपदात महत्त्वाचा वाटा उचलला होता.

Read in English