Join us  

Prithwi Shaw: पृथ्वी शॉ प्रेमात खरंच 'क्लिन बोल्ड' झाला का, व्हायरल झालेल्या फोटोतली 'ती' मिस्ट्री गर्ल कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 6:49 PM

Open in App
1 / 8

भारतीय क्रिकेट संघाचा धमाकेदार सलामीवीर पृथ्वी शॉ सध्या खूप चर्चेत आहे. खेळासह तो त्याच्या लव्ह लाईफमुळेही चर्चेत असतो.

2 / 8

पृथ्वी शॉ'ने व्हॅलेंटाईन डे दिवशी इन्स्टाग्रामवर एक स्टोरी ठेवली होती, ही स्टोरी त्याने काही मिनिटांतच डिलिट केली. यानंतर त्याची गर्लफ्रेंड कोण अशा चर्चा सुरू झाल्या. त्याची गर्लफ्रेंड निधी तापडिया असल्याचे बोलले जात आहे.

3 / 8

अभिनेत्री आणि मॉडेल निधी तापडिया 25 वर्षांची असून ती नाशिकची आहे. तिचा जन्म 13 सप्टेंबर 1997 रोजी झाला. पण, अस काहीही नसल्याचे पृथ्वी शॉ ने म्हटले आहे.

4 / 8

निधी सोशल मीडियावर सक्रिय असते. ती दररोज हे फोटो आणि व्हिडिओ तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.

5 / 8

निधीचे इन्स्टाग्रामवर 1 लाख 8 हजार फॉलोअर्स आहेत. निधीने 2016 मध्ये तिच्या करिअरला सुरुवात केली.

6 / 8

निधी प्रसिद्ध क्राईम शो सीआयडीमध्ये काम करण्याव्यतिरिक्त, 2019 मध्ये निधीने पंजाबी गाणे जट्टा कोकाच्या व्हिडिओमध्ये देखील काम केले होते.

7 / 8

पृथ्वी शॉ आणि निधी तापडिया यांच्या डेटच्या बातम्या अनेकवेळा समोर आल्या होत्या. मात्र त्यानंतर त्याची कोणत्याही प्रकारे पुष्टी होऊ शकली नाही.

8 / 8

पृथ्वी शॉने व्हॅलेंटाईन डे दिवशी इन्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली होती यावरुनही चर्चा सुरू झाल्या होत्या.

टॅग्स :पृथ्वी शॉ
Open in App