Join us  

Jasprit Bumrah Marriage Pic : जसप्रीत बुमराहचा कधी न पाहिलेला अंदाज; रोमँटिक पोझमध्ये दिसतोय हिरो!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 2:57 PM

Open in App
1 / 20

सर्व चर्चांना पूर्णविराम लावताना अखेर भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) १५ मार्चला स्पोर्ट्स प्रेझेंटर संजना गणेशन ( Sanjana Ganesan) हिच्यासोबत विवाह बंधनात अडकला.

2 / 20

जसप्रीतच्या लग्नाला फक्त २० पाहुण्यांना उपस्थिती होती आणि त्यांना मोबाईल सोबत राखण्यास मनाई करण्यात आलेली होती. त्यामुळे या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोंव्यतिरिक्त अन्य फोटो कुणी पाहिले नव्हते. पण, आता त्यांच्या लग्नापूर्वीच्या समारंभासह अन्य फोटो व्हायरल झाले आहेत.

3 / 20

भारत-इंग्लंड ( India vs England) यांच्यातल्या चौथ्या कसोटीच्या आधी जसप्रीतनं सुट्टी मागितली होती आणि त्यामागे लग्न हे कारण असल्याची चर्चा गेले अनेक दिवस सुरू होती. अखेर त्या खऱ्या ठरल्या.

4 / 20

'' प्रेम, जर ते योग्य असेल, तर आपल्याला योग्य मार्ग दाखवतं, आम्ही दोघं नवीन प्रवास सुरू करत आहोत. आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा आहे आणि या नव्या प्रवासाच्या बातमी तुमच्यासोबत वाटताना आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. हा आनंद तुमच्याशिवाय अपूरा आहे, असे जसप्रीत बुमराह आणि संजना गणेश यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली.

5 / 20

६ डिसेंबर १९९३मध्ये जसप्रीतचा जन्म गुजरातच्या अहमदाबाद येथे झाला. तो पाच वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे जस्बीर सिंग यांचे निधन झाले. त्यानंतर आई दलजीत बुमराह हिनं त्याचा सांभाळ केला. त्या अहमदाबाद येथील शाळेत शिक्षिका होत्या.

6 / 20

संजना गणेशन ही मॉडल आणि अँकर आहे. ती स्टार स्पोर्ट्स इंडियासोबत काम करत असून त्यांच्यासाठी तिनं क्रिकेट, बॅटमिंटन आणि फुटबॉल आदी अनेक स्पर्धांचे अँकरींग केले आहे. तिनं 2019च्या पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचेही सूत्रसंचालन केलं होतं.

7 / 20

पुणे येथील तिचा जन्म आहे. सिम्बॉससिस इंस्टीट्युटमधून तिनं B. Techचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यात तिने गोल्ड मेडलही पटकावलं आहे. त्यानंतर 2013-14मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरींग केलं.

8 / 20

स्टार स्पोर्ट्स वाहिनीसाठी स्पोर्ट्स प्रेझेंटर म्हणून काम करणारी संजना आणि जसप्रीत यांची पहिली भेट इंडियन प्रीमिअर लीग ( IPL) दरम्यान झाली. संजना ही कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) संघाची स्पोर्ट्स अँकर आहे.

9 / 20

स्पोर्ट्स प्रेझेंटर बनण्यापूर्वी संजनानं २०१२मध्ये 'Femina Style Diva’ फॅशन शो आणि २०२३मध्ये 'Femina Miss India Pune’ यात सहभाग घेतला होता. त्याच वर्षी तिनं Femina Officially Gorgeous Competition' मध्ये सहभाग घेतला.

10 / 20

२८ वर्षीय संजना MTV Splitsvilla 7 मधून टेलेव्हिजनवर पदार्पण केलं होतं, परंतु तिला दुखापतीमुळे ही मालिका सोडावी लागली.

11 / 20

12 / 20

13 / 20

14 / 20

15 / 20

16 / 20

17 / 20

18 / 20

19 / 20

20 / 20

टॅग्स :जसप्रित बुमराहसंजना गणेशन