दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज डेल स्टेन ( Dale Steyn) सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये ( Pakistan Super League ) खेळत आहे. तिथे जाऊन त्यानं वादग्रस्त विधान केलं आहे.
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( Indian Premier League) खेळण्यापेक्षा पाकिस्तान सुपर लीगमध्ये ( PSL) खेळणे अधिक फायद्याचे आहे, असे मत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ( Royal Challengers Bangalore) माजी गोलंदाजनं केलं. आयपीएलमध्ये बराच पैसा आहे, परंतु तिथं क्रिकेट कुठेतरी मागे पडल्यासारखं वाटतं, असेही तो म्हणाला. ( cricket gets forgotten)
एक्स्प्रेस ट्रीबूनशी बोलताना त्यानं आयपीएलच्या १४व्या पर्वातून माघार घेण्यामागचं कारण सांगितले. तो म्हणाला,'' मला काही काळ विश्रांती हवी होती. पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळणं हे अन्य फ्रँचायझी लीगपेक्षा एक खेळाडू म्हणून अधिक फायद्याचे आहे. आयपीएलमध्ये खेळताना मोठा चमू असतो, मोठी नावं असतात, खेळाडूंसाठी मोजलेल्या पैशांवर अधिक भर दिला जातो आणि अशात क्रिकेट कुठेतरी मागे पडतं.''
आयपीएलमध्ये डेल स्टेन डेक्कन चार्जर्स, सनरायझर्स हैदराबाद, गुजरात लायन्स आणि RCB या संघांकडून खेळला आहे. २०२१च्या आयपीएलमधून त्यानं माघार घेतली आणि तो सध्या PSL मध्ये सर्फराज अहमद याच्या नेतृत्वाखालील क्युएत्ता कलंदर्स संघाकडून खेळत आहे.
''पाकिस्तान सुपर लीग किंवा श्रीलंकन प्रीमिअर लीगमध्ये क्रिकेटला अधिक महत्त्व दिले जाते. मला इथे येऊन थोडेच दिवस झाले आहेत आणि इथे भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तिला फक्त क्रिकेटबद्दल जाणून घ्यायचं असतं. आयपीएलमध्ये मी हे सर्व विसरतो आणि आयपीएलमध्ये यंदा किती पैसा मिळणार, हाच एक प्रमुख मुद्दा चर्चिला जातो,'' असेही स्टेन म्हणाला.
आयपीएल २०२०मध्ये RCBकडून तीन सामने खेळला. त्याला फक्त १ विकेट घेता आली.