Join us

Photo : पाच वर्षांचं प्रेम अन् इंग्लंडच्या वर्ल्ड कप विजेत्या महिला क्रिकेटपटू कॅथरीन ब्रंट - नॅट शिव्हर यांचा विवाह!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 15:34 IST

Open in App
1 / 5

इंग्लंडला २०१७मध्ये वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या नॅट शिव्हर व कॅथरीन ब्रंट या महिला क्रिकेटपटूंनी रविवारी २९ मे रोजी एकमेकींशी लग्न केले. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने या दोघींना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर या दोघांच्या लग्नाची बातमी क्रिकेट वर्तुळाला समजली. पाच वर्ष या दोघी एकमेकांच्या प्रेमात आहेत.

2 / 5

शिव्हर व ब्रंट हे पहिलेच समलैंगिक कपल नाहीत. याआधी न्यूझीलंडच्या अॅमी सॅथरवेट व ली ताहूहू आणि दक्षिण आफ्रिकेच्या मॅरिझाने कॅप्प व डेन व्हॅन निएकर्क आदींनी एकमेकींशी विवाह केला आहे. या दोघीही इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाच्या प्रमुख खेळाडू आहेत.

3 / 5

सप्टेंबर २०२० मध्ये या दोघींचा विवाह होणार होता, परंतु कोरोना व्हायरसच्या संकटामुळे तो पुढे ढकलण्यात आला. २०१८च्या नव वर्षाच्या स्वागतावेळी या दोघींनी साखरपुडा केला होता.

4 / 5

कॅथरीनने १४ कसोटींत ५१ विकेट्स, १४० वन डे सामन्यांत १६७ आणि ९६ ट्वेंटी-२० सामन्यांत ९८ विकेट्स घेतल्या आहेत. नॅट शिव्हरने ७ कसोटींत ३४३ धावा, ८९ वन डे सामन्यांत २७११ व ९१ ट्वेंटी-२०त १७२० धावा केल्या आहेत.

5 / 5

कॅथरीन ब्रंट व नॅट शिव्हर यांनी २०२२च्या आयसीसी महिला वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले होते. पण, गतविजेत्या इंग्लंडला साखळी फेरीतच तीन पराभवाचा सामना करावा लागला, परंतु त्यांनी कमबॅक केले व अंतिम फेरीत प्रवेश केला. ऑस्ट्रेलियाकडून त्यांना हार मानावी लागली होती.

टॅग्स :इंग्लंड
Open in App