'लोक म्हणतील वैयक्तिक धावांसाठी खेळतोय'; शतक होण्यापूर्वी कोहली-राहुलचं काय बोलणं झालं?

कोहली ८१ धावांवर नाबाद खेळत होता. कोहलीला शतक झळकावण्यासाठी अगदी १९ धावांची गरज होती.

भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील विजयी घोडदौड चौथ्या सामन्यातही कायम राखली. गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर भारताच्या फलंदाजांनी बांगलादेशला झोडून काढले. भारताने ७ विकेट्स राखून आजचा सामना जिंकला.

कोहलीने ९७ चेंडूत १०३ धावांची नाबाद खेळी खेळली. यादरम्यान त्याने ४ षटकार आणि ६ चौकार लगावले. त्याचा स्ट्राईक रेट १०६.१८ होता. पण सर्वात जास्त रोमांच तेव्हा पाहायला मिळाला जेव्हा विजयासाठी ६६ चेंडूत १९ धावांची गरज होती.

यावेळी कोहली ८१ धावांवर नाबाद खेळत होता. कोहलीला शतक झळकावण्यासाठी अगदी १९ धावांची गरज होती. त्यानंतर केएल राहुल नॉन स्ट्राईकवर उभा राहिला. यानंतर कोहली पुढचे १५ चेंडू भारतीय संघ जिंकेपर्यंत स्ट्राइकवर राहिला.

यादरम्यान अनेक वेळा कोहलीने एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न केला, पण राहुलने नकार दिला. पण राहुलने ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर एकच रन घेतला, जेणेकरून पुढच्या ओव्हरमध्ये कोहलीला पुन्हा स्ट्राइक मिळू शकेल. यावेळी कोहलीला प्रत्येक वेळी एक धाव घ्यायची होती, पण कोहलीला शतक पूर्ण करता यावे म्हणून राहुल त्याला नकार देत होता.

राहुल सामन्यानंतर म्हणाला, 'मी सिंगल घेण्यास नकार दिला होता. एकही धाव घेतली नाहीस तर वाईट होईल, असे विराट म्हणाला होता. लोक विचार करतील की तो वैयक्तिक स्कोअरसाठी खेळत आहेत. पण मी म्हटलं की आपण आरामात सामना जिंकत आहोत. तु तुझे शतक पूर्ण करू शकतो.

यापूर्वी २०११मध्ये सुद्धा वर्ल्ड कपमध्ये बांगलादेश विरोधात कोहलीने शतकी खेळी केली होती आणि आज बारा वर्षांनी बांगलादेशविरुद्ध त्याने शतकी खेळी करत बांगलादेशला अस्मान दाखवले.