Join us  

कोहलीची हुकूमशाही संपवणाऱ्या बाबर आजमवर शोएब भडकला, जबरदस्त फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 7:50 PM

Open in App
1 / 9

पाकिस्तानचा स्टार फलंदाज (Pakistan Cricketer) बाबर आजमने (Babar Azam) विराट कोहलीची हुकूमशाही संपवत आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिलच्या (ICC) वनडे रँकिंगमध्ये पहिले स्थान पटकावले आहे. मात्र, बाबर आजम जगातील पहिल्या क्रमांकाचा फलंदाज ठरला असला तरी, पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) त्याच्या फलंदाजीवर नाखूश आहे.

2 / 9

शोएब अख्तरने बाबर आजमच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, त्याला विराट कोहली आणि ख्रिस गेल सारख्या फलंदाजांपासून शिकण्याचा सल्ला दिला आहे.

3 / 9

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात झालेल्या पराभवानंतर शोएब बाबर आजमवर भडकला आहे.

4 / 9

बाबर आजमच्या धिम्या फलंदाजीवर प्रश्न उपस्थित करत शोएब म्हणाला, त्याने टी-20 क्रिकेटमध्ये स्ट्राइक रेटवर लक्ष द्यायला हवे. शोएब अख्तर एका यूट्यूब चॅनलवर बोलत होता.

5 / 9

शेऐब म्हणाला, 'टी-20 क्रिकेटसाठी आपला स्ट्राइकरेट योग्य आहे आहे का, यावर आपल्या फलंदाजांनी विचार करायची गरज आहे. जर आपण ख्रिस गेल अथवा विराट कोहलीला 50 चेंडू दिले, तर ते काय करतील आणि बाबर आजमने काय केले?

6 / 9

बाबर एक चांगला खेळाडू आहे. पण 50 चेंडूत फक्त 50 धावाच काढणे योग्य नाही. विकेट जात असतील, तरी आपण दबावात येता कामा नये, असेही शोऐब म्हणाला.

7 / 9

पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सुरू असलेल्या चार सामन्यांची टी-20 मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. तिसरा टी-20 सामना बुधवारी सायंकाळी सेंच्युरियन येथे खेळला जाणार आहे. तर चौथा सामना 16 एप्रिलला आहे.

8 / 9

बाबर आजम तिसऱ्या टी-20 सामन्यापूर्वीच जगातील पहिल्या क्रमांकाचा फलंदाज झाला आहे. बाबर आजमने भारतीय कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले आहे.

9 / 9

बाबर आजम आयसीसी वनडे रँकिंगमध्ये टॉपवर पोहोचणारा चौथा पाकिस्तानी फलंदाज आहे. यापूर्वी जहीर अब्बास, जावेद मियांदाद आणि मोहम्मद यूसुफ पहिल्या स्थानावर पोहोचले होते.

टॅग्स :शोएब अख्तरपाकिस्तानक्रिकेट सट्टेबाजीद. आफ्रिका