Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL टीमचे मालक

By admin | Updated: April 8, 2015 00:00 IST

Open in App

मुंबई इंडियन्स : संघ रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या मालकीचा असून मुकेश अंबानी हे त्याचे हेड आहेत. तर मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी या संघाचे काम पाहतात.





किंग्स एलेवन पंजाब : अभिनेत्री प्रीती झिंटा आणि नेस वाडिया यांच्यासोबतच या संघाचे सहमालक म्हणून करण पॉल यांचे नाव सुध्दा घेतले जाते.





कोलकाता नाईट रायडर्स : केकेआर नावाने ओळखला जाणारा हा संघ अभिनेता शाहरुख खान व अभिनेत्री जुही चावलाचा पती जय मेहता हे यांच्या मालकीचा आहे.





चेन्नई सुपर किंग्स : आयपीएलमध्ये दोनदा विजेता ठरलेला हा संघ बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन व सिंमेट इंडिया कंपनी यांच्या मालकीचा होता. परंतू आता तो चेन्नई सुपर किंग्स क्रिकेट लिमिटेडच्या मालकीचा आहे.





रॉयल चॅलेंजर बंगळुरू : चा संघ उद्योगपती विजय माल्या यांच्या मालकीचा असून मुकेश अंबानी यांच्यानंतर सर्वात जास्त बोली लावून त्यांनी खेळाडू खरेदी केले आहेत.





राजस्थान रॉयल्स : हा संघ अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या मालकीचा असल्याची चर्चा असली तरी खरा मालक मनोज बडाले हा आहे. तसेच लॅक्लन मर्डोक आदित्य चेल्लारम आणि सुरेश चेल्लारम यांची सुध्दा यामध्ये भागीदारी आहे.





सनरायझर्स हैदराबाद : हा संघ हैदराबाद स्थित असलेल्या सन टिव्हीने खरेदी केला असून कलानीधी मारन या कंपनीचे मालक आहेत.





दिल्ली डेअरडेव्हिल्स : हा संघ जीएमआर ग्रुप कंपनीच्या मालकीचा असून या कंपनीचे मालक जी एम राव हे आहेत.