'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...

Pakistan Cricket Match Referee Andy Pycroft Controversy Asia Cup 2025 : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दावा केला होता की, सामनाधिकाऱ्यांनी त्यांची माफी मागितली म्हणून ते सामना खेळले.

आशिया कपमध्ये युएई विरूद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानी संघ स्टेडियममध्ये उशिरा पोहोचला. कारण त्यांना मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांनी पाकिस्तानी संघाची माफी मागावी अशी इच्छा होती.

मॅच रेफरींनी पाकिस्तानी संघाशी संपर्क साधला आणि त्यानंतर रेफरींनी पाक कर्णधार, व्यवस्थापक आणि मुख्य प्रशिक्षक यांची माफी मागितल्याचा दावा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केला.

तशातच आता या प्रकरणाबाबत एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अहवालात असे दिसून आले आहे की अँडी पायक्रॉफ्ट यांनी पाकिस्तान संघाची तर सोडाच, कुणाचीही माफी मागितली नाही.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पायक्रॉफ्ट यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किंवा कर्णधाराची माफी मागितली नाही. अहवालांनुसार माफीचा प्रश्नच नव्हता, कारण मॅच रेफ्रीने कोणतीही चूक केली नव्हती.

पायक्रॉफ्ट यांनी स्वतः पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा, संघ व्यवस्थापक नवीद अक्रम चीमा आणि मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांना झालेले गैरसमज दूर करण्यासाठी त्यांच्या खोलीत बोलावले होते.

पीसीबीने मात्र सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसिद्ध करून म्यूट ठेवला व कोण काय बोलतंय याचा आवाज नसल्याने माफीचा दावा केला. त्यानंतर पीसीबी मीडियात खोटे दावे करत असल्याचे समोर आले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अँडी प्रॉयक्रॉफ्ट यांनी केबिनमध्ये घडलेल्या संभाषणाच माफी मागितली नाही. याउलट त्यांनी गैरसमज दूर करायला बोलवले होते. त्यानंतर ते सामनाधिकारी म्हणूनही उभे राहिले.