Join us  

NZ vs ENG : १४६ वर्षांच्या कसोटी इतिहासात दुसऱ्यांदाच घडले असे काही! न्यूझीलंडने इंग्रजांना पाजले पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 2:33 PM

Open in App
1 / 5

इंग्लंडच्या पहिल्या डावातील ८ बाद ४३५ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव २०९ धावांवर गडगडला. फॉलो ऑन घेत किवी संघ मैदानावर उतरला अन् कर्णधार केन विलियम्सन दमदार खेळला. त्याच्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने दुसऱ्या डावात ४८३ धावा केल्या. विजयासाठी २५८ धावांचा पाठला करताना इंग्लंडचा संपूर्ण संघ २५६ धावांवर माघारी परतला.

2 / 5

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात फॉलो ऑन स्वीकारून विजय मिळवणारा किवी हा चौथा संघ ठरला. यूप्रीव इंग्लंडने १८९४ व १९८१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि भारताने २००१मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवले होते.

3 / 5

आजच्या पूर्वी पहिल्या डावात २००+ धावांची आघाडी घेऊन इंग्लंड १७७ कसोटींत कधीच पराभूत झाले नव्हते. यापूर्वी १९६१ मध्ये ओल्ड ट्रॅफर्ड येथे पहिल्या डावात १७७ धावांची आघाडी घेऊन इंग्लंडला हार मानावी लागली होती.

4 / 5

न्यूझीलंडविरुद्धच्या आजच्या पराभवापूर्वी इंग्लंडने सलग सहा सामने जिंकले होते आणि २००४ नंतरची ही दुसरी सलग विजयाची मालिका आहे. २००४मध्ये त्यांनी सलग ८ कसोटी सामने जिंकले होते. २०१०मध्ये त्यांनी सलग सहा सामने जिंकले होते.

5 / 5

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात फॉलो ऑन स्वीकारून एक धावांनी विजय मिळवणारा न्यूझीलंड हा दुसराच संघ ठरला. यापूर्वी १९९३ मध्ये वेस्ट इंडिजने १८६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियावर १ धावांनी विजय मिळवला होता.

टॅग्स :न्यूझीलंडइंग्लंड
Open in App