‘माझा धाकटा भाऊ आता…’, सारा तेंडुकलरने शेअर केले अर्जुनच्या लग्नातील खास फोटो

Arjun Tendulkar Wedding: मास्टर ब्लास्ट सचिन तेंडुकलरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा नुकताच त्याची मैत्रिण सानिया चांडोक हिच्यासोबत विवाहबद्ध झाला. दरम्यान, सचिन तेंडुलकरची लेक आणि अर्जुनची बहीण सारा तेंडुलकर हिने भावाच्या लग्नातील खास फोटो शेअर केले आहेत.

मास्टर ब्लास्ट सचिन तेंडुकलरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा नुकताच त्याची मैत्रिण सानिया चांडोक हिच्यासोबत विवाहबद्ध झाला.

या विवाह सोहळ्याला सचिन तेंडुलकर याच्या कुटुंबीयांचे अनेक निकटवर्तीय मान्यवर आणि मित्रमंडळी उपस्थित होते.

दरम्यान, सचिन तेंडुलकरची लेक आणि अर्जुनची बहीण सारा तेंडुलकर हिने भावाच्या लग्नातील खास फोटो शेअर केले आहेत.

माझा धाकटा भाऊ आता सानिया चांडोक हिचा झाला आहे, अशी कॅप्शन देत साराने हे फोटे इन्स्टावर शेअर केले आहेत.

तसेच हे विश्व तुम्हा दोघांवर खूप आशीर्वाद भरभराटीचा वर्षाव करो. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्व होवोत आणि तुमच्या संसाराला कुणाची नजर ना लागो, असा शब्दात साराने भाऊ आणि वहिनीला शुभेच्छा दिल्या आहेत.