Dewald Brevis Girlfriend MI vs KKR IPL 2022 Live Updates : डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या फटकेबाजीची पुण्यात हवा अन् सोशल मीडियावर गर्लफ्रेंड ठरतेय 'फायर'! Photo

मुंबई इंडियन्स आणि कोलकात नाईट रायडर्स आजच्या सामन्यात प्रत्येकी दोन बदलांसह मैदानावर उतरले आहेत. KKR च्या ताफ्यात पॅट कमिन्स परतला आहे, तर जम्मू-काश्मीरचा २२ वर्षीय रसिख सलाम पदार्पण करत आहे.

मुंबई इंडियन्स आणि कोलकात नाईट रायडर्स आजच्या सामन्यात प्रत्येकी दोन बदलांसह मैदानावर उतरले आहेत. KKR च्या ताफ्यात पॅट कमिन्स परतला आहे, तर जम्मू-काश्मीरचा २२ वर्षीय रसिख सलाम पदार्पण करत आहे.

MI नेही दोन बदल करताना सूर्यकुमार यादवसाठी अनमोलप्रीत सिंगला बाकावर बसवले, तर दक्षिण आफ्रिकेचा Baby AB डेवॉल्ड ब्रेव्हिस पदार्पण करणार आहे. कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर ब्रेव्हिस मैदानावर आला आणि खणखणीत चौकार खेचून खाते उघडले. त्यानंतर त्याने दोन षटकार व आणखी एक चौकार खेचला. १९ चेंडूंत २९ धावांची त्याची ही खेळी वरूण चक्रवर्थीने संपुष्टात आणली.

आयपीएलमध्ये पदार्पण करणारा तो पाचवा युवा खेळाडू ठरला. ब्रेव्हिस आता १८ वर्ष व ३४२ दिवसांचा आहे. या विक्रमात मुजीब उर रहमान ( १७ वर्ष व ११ दिवस), संदीप लामिचाने ( १७ वर्ष व २८३ दिवस), मिचेल मार्श ( १८ वर्ष व१७० दिवस) आणि राशिद खान ( १८ वर्ष व १९७ दिवस) हे आघाडीवर आहेत.

जोहान्सबर्ग येथे २९ एप्रिल २००३चा डेवॉल्ड ब्रेव्हिसचा जन्म... त्याने प्रेटोरिया येथील Afrikaanse Hoer Seunskool (Affies) मध्ये शालेय शिक्षण पूर् केले. याच शाळेत त्याने क्रिकेटचे धडेही गिरवले. फॅफ ड्यू प्लेसिस व एबी डिव्हिलियर्स हेही स्टार खेळाडूही याच शाळेतील विद्यार्थी आहेत.

घराच्या मागील मोकळ्या जागेत तो क्रिकेटचा सराव करायचा आणि त्याची आई त्याच्या सरावात मदत करायची. त्या डेवॉल्डला गोलंदाजी करायच्या. नोव्हेंबर २०१६मध्ये त्याने नॉर्दर्नच्या १३ वर्षांखालील संघात दमदार कामगिरी केली आणि त्या जोरावर त्याने १९ वर्षांखालील संघात स्थान पटकावले.

८ ऑक्टोबर २०२१मध्ये त्याने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून दक्षिण आफ्रिकेच्या १९ वर्षांखालील संघातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. १८ वर्षीय ब्रेव्हिसने वेस्ट इंडिज येथे झालेल्या Under-19 World Cup स्पर्धेत त्याने ६ सामन्यात सर्वाधिक ५०६ धावा केल्या. त्यात दोन शतकांचा आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.

आयपीएल ऑक्शनमध्ये २० लाख मुळ किमतीच्या खेळाडूंमध्ये त्याने नाव नोंदवले होते आणि पंजाब किंग्स व चेन्नई सुपर किंग्स यांच्यात त्याच्यासाठी कडवी टक्कर पाहायला मिळाली, परंतु मुंबई इंडियन्सने एन्ट्री घेत युवा खेळाडूला ३ कोटींमध्ये आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले.

लिंडी मारी असे त्याच्या गर्लफ्रेंडचे नाव आहे आणि या दोघांचे सोशल मीडियावर सोबत बरेच फोटो आहेत. लिंडी सुंदरतेच्या बाबतीत बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींना सहज टक्कर देईल अशी आहे.

लिंडी मारी असे त्याच्या गर्लफ्रेंडचे नाव आहे आणि या दोघांचे सोशल मीडियावर सोबत बरेच फोटो आहेत. लिंडी सुंदरतेच्या बाबतीत बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींना सहज टक्कर देईल अशी आहे.