Mumbai Indians, IPL 2022 Mega Auction : आयपीएल इतिहासात मुंबई इंडियन्सने पाण्यासारखा पैसा ओतलेले पाच खेळाडू तुम्हाला माहित्येयत का?

Mumbai Indians, IPL 2022 Mega Auction : IPL 2022 Mega Auction साठी नोंदणी केलेल्या १२१४ खेळाडूंपैकी केवळ ५९० खेळाडूंच्या नावांचा समावेश अंतिम यादीत करण्यात आला आहे. या ५९० खेळाडूंमध्ये ३७० भारतीय आणि २२० परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.

Mumbai Indians, IPL 2022 Mega Auction : IPL 2022 Mega Auction साठी नोंदणी केलेल्या १२१४ खेळाडूंपैकी केवळ ५९० खेळाडूंच्या नावांचा समावेश अंतिम यादीत करण्यात आला आहे. या ५९० खेळाडूंमध्ये ३७० भारतीय आणि २२० परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.

मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२२साठी रोहित शर्मा ( १६ कोटी), जसप्रीत बुमराह ( १४ कोटी), किरॉन पोलार्ड ( ६ कोटी), सूर्यकुमार यादव ( ८ कोटी) या चार खेळाडूंना आपल्या ताफ्यात दाखल केले असून त्यांच्याकडे आता ४८ कोटी रक्कम शिल्लक आहे. त्यात त्यांना २१ खेळाडूंना करारबद्ध करायचे आहेत.

आयपीएल इतिहासात मुंबईने ऑक्शनमध्ये सर्वात बोली लावून ताफ्यात दाखल करू घेतलेल्या पाच टॉप खेळाडूंचा विक्रम यंदा मोडला जाण्याची शक्यता आहे. पण, त्याआधी मुंबईने लिलावात सर्वाधिक रक्कम मोजून खरेदी केलेल्या अव्वल पाच खेळाडू कोण हे जाणून घेऊयात...

किरॉन पोलार्ड ( Kieron Pollard) - मुंबई इंडियन्सचा सर्वात जुना सहकारी... मुंबई इंडियन्सकडून १७८ सामन्यांत त्याने ३२६८ धावा केल्या आहेत आणि ६५ विकेट्सही घेतल्या आहेत. २०१८मध्ये मुंबई इंडियन्सने ५.४ कोटी रुपये मोजून पोलार्डला पुन्हा आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले.

इशान किशन ( Ishan Kishan ) - २०१८मध्ये मुंबई इंडियन्सने इशान किशनसाठी ६.२ कोटी रुपये मोजले. त्याने आतापर्यंत आयपीएलच्या ६१ सामन्यांत १४५२ धावा केल्या आहेत. २०२० च्या पर्वात मुंबईसाठी त्याने १४ सामन्यांत ५१६ धावा कुटल्या होत्या.

नॅथन कोल्टर नाएल ( N Coulter Nile) - ऑस्ट्रेलियाच्या या गोलंदाजासाठी मुंबई इंडियन्सने २०२०मध्ये ८ कोटी रुपये मोजले. पण, १२ सामन्यांत त्याला केवळ १२ विकेट्स घेता आल्या आहेत.

कृणाल पांड्या ( Krunal Pandya ) - २०१८मध्ये मुंबई इंडियन्सने अष्टपैलू खेळाडूसाठी ८.८ कोटी रुपये मोजले. त्याने आयपीएलमध्ये एकूण ८४ सामन्यांत ११४३ धावा आणि ५१ विकेट्स घेतल्या आहेत.

रोहित शर्मा ( Rohit Sharma) - इंडियन प्रीमिअर लीगमधील सर्वात यशस्वी कर्णधार. रोहितने २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० मध्ये मुंबई इंडियन्सला जेतेपद पटकावून दिले आहे. २०११मध्ये त्याच्यासाठी फ्रँचायझीने ९.२ कोटी मोजले होते. त्याच्या नावावर आयपीएलमध्ये २१३ सामन्यांत ५६११ धावा आहेत. त्यात एक शतकाचाही समावेश आहे.