मिसेस 'धोनी' ४१ वर्षीय अभिनेत्याची 'जबरा फॅन', आता आहे एका चित्रपटाच्या प्रतीक्षेत

Sakshi Dhoni Favorite Hero : महेंद्रसिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षी धोनी फिल्मी जगतात पाऊल ठेवत आहेत.

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षी धोनी आता फिल्मी जगतात पाऊल ठेवत आहेत. त्यांनी प्रोडक्शनच्या दुनियेत प्रवेश केला असून लवकरच त्यांचा एक चित्रपट येणार आहे.

धोनी प्रोडक्शनचा पहिला चित्रपट LGM चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अलीकडेच या चित्रपटाशी संबंधित एका कार्यक्रमादरम्यान धोनीची पत्नी साक्षीने तिच्या साऊथ चित्रपटांबद्दलच्या प्रेमाविषयी भाष्य केले.

साक्षी धोनीला चित्रपट पाहायला आवडतात. यामुळेच त्यांनी व्यवसायाची योजना आखण्यासाठी चित्रपट जगताची निवड केली. पती धोनीसोबत मिळून तिने आपले नवीन प्रोडक्शन हाऊस उघडले आहे.

मिसेस धोनीचा जन्म १९ नोव्हेंबर १९८८ रोजी झाला आणि तिने २०१० मध्ये क्रिकेटर माहीसोबत लग्न केले. आता साक्षी धोनीने चित्रपटांच्या दुनियेत पाऊल ठेवले असून तिच्या प्रोडक्शनचा 'LetsGetMarried' हा तामिळ चित्रपट ४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

खरं तर साक्षी धोनीने अलीकडेच 'एलजीएम' चित्रपटाशी संबंधित एका कार्यक्रमात चित्रपटाची माहिती दिली. यावेळी साक्षीने साऊथमधील तिच्या आवडत्या अभिनेत्याबद्दल देखील सांगितले.

साक्षीच्या म्हणण्यानुसार, ती ४१ वर्षीय अल्लू अर्जुनची जबरा फॅन आहे. अर्जुनच्या अभिनयाची शैली माझ्यासह अनेकांना भुरळ घालते असे तिने सांगितले.

साक्षीने सांगितले की, तिने यूट्यूबवर अल्लू अर्जुनचे सर्व हिंदी डब केलेले चित्रपट पाहिले आहेत. तसेच त्याच्या 'पुष्पा' चित्रपटाने खूप प्रभावित केले असल्याचे ती सांगते.

दरम्यान, अल्लू अर्जुनच्या करोडो चाहत्यांप्रमाणे साक्षीही 'पुष्पा २' चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे.

अलीकडेच अल्लू अर्जुनचा चित्रपट 'पुष्पा २' ला साऊथच्या मोस्ट अवेटेड चित्रपटांच्या यादीत अव्वल स्थान मिळाले आहे.