MS Dhoni, कोर्टात १० लाख रुपये जमा करा..!! उच्च न्यायालयाने दिले आदेश, नेमकं प्रकरण काय?

MS Dhoni High Court IPL 2026: महेंद्रसिंग धोनी आगामी IPL मध्ये खेळणार आहे, पण त्याआधी त्याला असे निर्देश देण्यात आले आहेत

तामिळनाडूतील मद्रास उच्च न्यायालयाने टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीला याला १० लाख रुपये जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

एका खटल्यातील सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती आर एन मंजुळा यांनी जारी केलेल्या आदेशाचा अंतरिम आदेशाचा भाग म्हणून हे निर्देश देण्यात आले.

२०१३च्या आयपीएल बेटिंग घोटाळ्याशी धोनीचा संबंध आहे, असा आरोप निवृत्त आयपीएस अधिकारी जी. संपतकुमार यांच्याकडून करण्यात आला होता.

महेंद्रसिंह धोनीने निवृत्त आयपीएस अधिकारी जी. संपतकुमार यांच्याविरुद्ध मानहानीच्या नुकसान भरपाईसाठी १०० कोटी रुपयांचा दावा केला होता.

या प्रकरणात, सुनावणीदरम्यान विविध पुरावे सादर केले जात आहेत. या पुराव्यांमध्ये याच्याशी संबंधित काही सीडींचा समावेश करण्यात आला आहे.

इंटरप्रेटरने न्यायालयाला सांगितले की ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी अंदाजे ३-४ महिने लागतील आणि फुल-टाइम इंटरप्रेटर व टायपिस्ट आवश्यक असेल.

त्यामुळे मानहानीच्या खटल्याशी संबंधित सीडीच्या मजकुराच्या ट्रान्सक्रिप्शन आणि भाषांतरासाठी त्याने १० लाख रुपये द्यायचे निर्देश कोर्टाने दिले आहेत.