Join us  

IPL Final, CSK Won 4th Title : आम्ही दमदार पुनरागमन करू!; MS Dhoniनं ते वाक्य खर करून दाखवलं, CSKला चौथं जेतेपद जिंकून दिलं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 11:52 PM

Open in App
1 / 10

महेंद्रसिंग धोनीचा ( MS Dhoni) हाच संघ मागच्या आयपीएलमध्ये स्पर्धेतून बाद होणारा पहिला मानकरी ठरला होता. धोनीच्या संघाची इतकी लाजीरवाणी कामगिरी आयपीएल एतिहासात कधी झाली नव्हती आणि प्रथमच हा संघ प्ले ऑफमध्ये पात्र ठरू शकला नव्हता. बरोबर एक वर्षांनी हाच संघ आज आयपीएल २०२१चा विजेता आहे.

2 / 10

ऋतुराज गायकवाड व फॅफ ड्यू प्लेसिस ही जोडी यंदाच्या आयपीएलमधील सर्वात यशस्वी सलामीवीर जोडी ठरली. त्यांनी ७५२ हून अधिक धावा केल्या. ऋतुराजनं वैयक्तित ३२ धावा करताना फॅफसह पहिल्या विकेटसाठी ६१ धावा जोडल्या. फॅफला तिसऱ्या षटकात दिनेश कार्तिकनं ( यष्टिचीत) जीवदान दिलं.

3 / 10

त्यानंतर रॉबीन उथप्पानं १५ चेंडूंत ३ खणखणीत षटकारांसह ३१ धावा कुटल्या. मोईन अली अली २० चेंडूंत ३७ धावांवर नाबाद राहिला. फॅफनं ५९ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ८६ धावा केल्या आणि चेन्नईला २० षटकांत ३ बाद १९२ धावा उभारून दिल्या. कोलकाताचा ल्युकी फर्ग्युसननं ५६ धावा दिल्या. सुनील नरीननं २६ धावांत २ विकेट्स घेतल्या.

4 / 10

प्रत्युत्तरात शुबमन गिल व वेंकटेश अय्यर यांनीही धुरळा उडवला. वेंकटेशनं ३१ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. रवींद्र जडेजाच्या त्या षटकात गिलनं उत्तुंग फटका टोलावला अन् अंबाती रायुडूनं तो चेंडू टिपला. CSKच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला, परंतु हवेत झेपावलेला चेंडू स्पायडर कॅमेराच्या तारेवर आदळल्याचे स्पष्ट दिसले अन् गिलला जीवदान मिळाले.

5 / 10

११व्या षटकात KKRच्या डावाला कलाटणी मिळाली. शार्दूल ठाकूर पुन्हा एकदा CSKचा संकटमोचक ठरला. त्यानं ११व्या षटकात वेंकटेश ( ५०) व नितीश राणा ( ०) यांना माघारी पाठवले. पुढच्याच षटकात जोश हेझलवूडनं KKRला आणखी एक धक्का देताना सुनील नरीनची ( २) विकेट काढली.

6 / 10

दीपक चहरनं १४व्या षटकात KKRला मोठा धक्का दिला. चहरच्या फुलटॉसवर पहिल्या स्टम्पवर लेगसाईटला फटका मारण्याच्या प्रयत्नात गिल पायचीत झाला. तो ५१ धावांवर माघारी परतला. दिनेश कार्तिकनं पहिल्याच चेंडूवर पुल शॉट मारून षटकार खेचला, परंतु त्याला मोठी खेळी करता आली नाही. रवींद्र जडेजाच्या चेंडूवर फटका मारण्याच्या प्रयत्नात तो रायुडीच्या हाती झेल देऊन परतला. शाकिब अल हसनलाही जडेजानं पायचीत केलं. बिनबाद ९१ वरून KKRची अवस्था ६ बाद १२० अशी झाली.

7 / 10

क्षेत्ररक्षणात दुखापत झालेला राहुल त्रिपाठी ८व्या क्रमांकावर फलंदाजीला आला, परंतु शार्दूलनं त्याची विकेट घेतली. दीपक चहरनं ३१ धावांत १, रवींद्र जडेजानं ३७ चेंडूंत २ विकेट्स घेतल्या. KKR चा कर्णधार इयॉन मॉर्गनही ( ४) जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर बाद झाला. दीपक चहरनं सीमारेषेवर अफलातून झेल टिपला. आता कोलकाताचे कमबॅक अशक्यच होते आणि चेन्नईच्या विजयाची औपचारिकता पूर्ण व्हायची बाकी होती.

8 / 10

चेन्नईनं हा सामना जिंकला. २०१०, २०११, २०१८नंतर चेन्नईनं चौथ्यांदा जेतेपद नावावर केलं. शार्दूरनं ३८ धावांत ३ विकेट्स घेतल्या. शार्दूलनं त्याच्या चौथ्या षटकात १७ धावा दिल्या. IPL 2020 मधील अखेरच्या सामन्यात धोनी म्हणाला होता, की आम्ही दमदार पुनरागमन करून. तिच आमची ओळख आहे. आणि आज धोनीनं ते शब्द खरं करून दाखवले.

9 / 10

10 / 10

टॅग्स :आयपीएल २०२१महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सकोलकाता नाईट रायडर्स
Open in App