Join us  

मोहम्मद शमीने रचले विक्रमांचे इमले!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 4:01 PM

Open in App
1 / 6

भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीने पर्थ कसोटीच्या चौथ्या दिवशी 56 धावांत 6 विकेट घेत सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. याच वर्षाच्या सुरुवातीला त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 28 धावांत 5 विकेट घेतल्या होत्या.

2 / 6

शमीने चार वेळा कसोटी क्रिकेटमध्ये एकाच डावात पाच विकेट घेतल्या आहेत. मात्र, त्याला प्रथमच एका डावात पाचपेक्षा अधिक विकेट घेता आल्या आहेत.

3 / 6

ऑस्ट्रेलियात सर्वोत्तम कामगिरी करणारा शमी चौथा भारतीय गोलंदाज ठरला आहे. या यादित कपिल देव अग्रक्रमांकावर आहे. कपिल देव यांनी 1985 साली अॅडलेड येथे 106 धावंत 8 विकेट घेतल्या होत्या. अजित आगरकर ( 6/41) आणि सय्यद आबिद अली ( 6/55) हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

4 / 6

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतीय गोलंदाजांना केवळ 14 वेळाच आशियाई खंडाबाहेर एका डावात सहा विकेट घेता आल्या आहेत.

5 / 6

2018 मध्ये भारताच्या गोलंदाजांनी एकूण सातवेळा एका डावात पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. याआधी 1981 व 2014 मध्ये भारतीय गोलंदाजांनी प्रत्येकी 6-6 वेळा पाच विकेट घेतल्या होत्या.

6 / 6

शमीने या कॅलेंडर वर्षात 44 विकेट्स घेतल्या आहेत. 2011 नंतर प्रथमच भारतीय जलदगती गोलंदाजाला कॅलेंडर वर्षात 40 पेक्षा जास्त विकेट घेता आल्या आहेत. 2011 मध्ये इशांत शर्माने अशी कामगिरी केली होती.

टॅग्स :मोहम्मद शामीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया