टीम इंडियाच्या सलामीवीराचा रोमँटीक अंदाज...

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत रोहित शर्मासोबत मयांक अग्रवाल सलामीला येणार आहे. कसोटी मालिकेत त्यानं मिळालेल्या संधीचं सोनं केलं आहे. मैदानावर मयांक आक्रमक वाटत असला, मैदानाबाहेर तो तितकाच रोमँटीक आहे. म्हणूनच तर त्यानं गुडघ्यावर बसून प्रेयसीला प्रपोज केलं होतं...

कर्नाटकच्या खेळाडूनं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी संघात पदार्पण केले होते आणि त्यात त्यानं 76 धावांची खेळीही केली होती.

जून 2018मध्ये मयांकने प्रेयसी आशिता सूदसोबत विवाह केला.

मयांक आणि आशिताची लव्ह स्टोरी कोणालाही परत प्रेमात पडायला भाग पाडेल अशी आहे.

मयांक आणि आशिता एकमेकांना आठ वर्ष डेट करत होते.

आपल्या दमदार कामगिरीने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या मयांकने प्रेमाच्या दुनियेतही बाजी मारली आहे

मयांकने लंडन आय येथे गर्लफ्रेंडला प्रपोज केलंय.

लग्नाच्या अवघ्या काही महिन्यातच त्याला लॉटरी लागली आणि टीम इंडियाकडून आता तो पदार्पण करत आहे.