Join us  

AB de Villiers बद्दल वाढला आदर; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न परतण्याचा का घेतला निर्णय?, मार्क बाऊचरनं दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 5:14 PM

Open in App
1 / 9

दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज एबी डिव्हिलियर्स ( AB de Villiers) यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय मागे घेण्यास नकार दिला अन् चाहते निराश झाले.

2 / 9

एबी डिव्हिलियर्स भारतात होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिकेकडून तशा हालचालीही सुरू होत्या.

3 / 9

आफ्रिका क्रिकेट मंडळानं मंगळवारी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संघ जाहीर केला अन् त्याचवेळी एबीच्या पुनरागमनाच्या चर्चांना पूर्णविराम लावला. पण, एबीनं हा निर्णय का घेतला, याबाबतचा खुलासा बुधवारी झाला.

4 / 9

एबी डिव्हिलियर्सनं निवृत्तीचा घेतलेला निर्णय मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केल्याचे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनं सांगितले. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनं त्यामागचं कारण सांगितलं. ( South African cricket coach Mark Boucher shared more details about why De Villiers refused to come out of retirement).

5 / 9

एबीनं 114 कसोटींत 50.66च्या सरासरीनं 8765 धावा केल्या आहेत. त्यात 22 शतकं व 46 अर्धशतकांचा समावेश असून नाबाद 278 ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. 228 वन डे सामन्यांत त्याच्या नावावर 25 शतकं व 53 अर्धशतकांसह 9577 धावा आहेत. 78 ट्वेंटी-20त 1672 धावा त्यानं केल्या आहेत.

6 / 9

15 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत एबी डिव्हिलियर्सनं तीनवेळा वर्षातील आयसीसीचा सर्वोत्तम वन डे क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावला. 2019मध्ये विस्डेननं निवडलेल्या दशकातील सर्वोत्तम पाच खेळाडूंमध्ये त्याचा समावेश होता.

7 / 9

त्यानं आफ्रिकेच्या तीनही फॉरमॅटमधील संघाचे नेतृत्वही केलं. पण, दुखापतींमुळे त्यानं कसोटी क्रिकेटचे कर्णधारपद सोडले. 2017मध्ये त्यानं मर्यादित षटकांच्या संघाचेही नेतृत्व दुसऱ्याच्या खांद्यावर सोपवले. मे 2018मध्ये त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

8 / 9

''एबीकडे कारण आहे आणि त्याचा मी आदर करतो. दुर्दैवानं त्याला पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळायचे नाही. मी याला दुर्दैव म्हणतो कारण आम्हा सर्वांना आजही वाटतं की तो सर्वोत्तम खेळाडू आहे आणि ट्वेंटी-20 क्रिकेटमधील तो अद्यापही दमदार खेळ करतोय. पण, त्याच्या येण्यानं संघात आधीपासून असलेल्या कुणातरी एका खेळाडूवर अन्याय झाला असता, असे त्याला वाटले. या गोष्टीनं त्याला स्वस्थ बसू दिले नसते,''असे बाऊचरनं सांगितले.

9 / 9

बाऊचर पुढे म्हणाला,''प्रशिक्षक म्हणून संघात सर्वोत्तम खेळाडू असावा यासाठी माझे प्रयत्न असतात. एबीच्या येण्यानं संघात मोठे चैतन्य निर्माण झाले असते, परंतु त्याच्या निर्णयाचा मी आदर करतो. हे न भरणारे नुकसान आहे, परंतु आता पुढे जायला हवं.''

टॅग्स :एबी डिव्हिलियर्सद. आफ्रिका