Join us  

महेंद्रसिंग धोनी नाराज झाला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 3:34 PM

Open in App
1 / 8

नागपुरात क्रिकेट अकादमीच्या उद्घाटनावेळी गोंधळ झाल्याने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी कार्यक्रम अर्ध्यावर सोडून परत गेला.

2 / 8

एसजीआय या संस्थेमार्फत नागपूरच्या गायकवाड पाटील आंतरराष्ट्रीय शाळेच्या आवारात धोनी रेसिडेंशियल क्रिकेट अकादमी सुरु करण्यासाठी आला होता.

3 / 8

या अकादमीचं उद्घाटन महेंद्रसिंह धोनीच्या हस्ते झालं. मात्र, ढिसाळ नियोजन आणि उद्घाटन कार्यक्रमातील गोंधळामुळे नाराज झालेल्या धोनीने कार्यक्रम अर्ध्यावर सोडला आणि हॉटेलवर परतला.

4 / 8

अकादमीचं उद्घाटन झाल्यानंतर स्टेजजवळ मीडियाचे कॅमेरे आणि हौशी प्रेक्षक मोबाईलमध्ये धोनीची झलक कैद करणारे जमा झाले. परिणामी इथे तुफान गर्दी झाली.

5 / 8

धोनीच्या सुरक्षेसाठी असलेल्या खाजगी सुरक्षा एजन्सीच्या बाऊन्सर्सनी लोकांसोबत धक्काबुक्की केली. त्यामुळे धोनी काहीसा नाराज झाला होता.

6 / 8

सुरुवातीला प्रचंड गर्दी झाल्याने धोनीचे स्टेजपर्यंत आगमन मुख्य मार्गावरुन शक्य झाले नाही. त्यामुळे धोनीला मागच्या बाजूने गवताच्या आणि काटेरी झुडूपांमधून उद्घाटनस्थळी आणावं लागलं.

7 / 8

स्टेजवरील कार्यक्रम संपल्यानंतर धोनी रेसिडेंशियल अकादमीच्या खेळाडूंसोबत मैदानावर जाणार होता. मात्र नाराज धोनीने तिकडे न जाताच आणि थेट हॉटेल गाठलं.

8 / 8

आयोजनकांनी उपस्थित लोकांना धोनी निघून गेल्याचे सांगितलंच नाही. साडेबारा वाजेपर्यंत लोक मैदानाजवळ धोनी येईल म्हणून वाट पाहत बसले होते. अखेर पोलिसांनी पाऊणच्या सुमारास धोनीने शाळेचा परिसर सोडल्याचं उपस्थितांना सांगितलं. ( सर्व छायाचित्रेः राजेश टिकले)

टॅग्स :महेंद्रसिंह धोनी