Join us  

२३२ धावा अन् ५ विकेट्स! वन डेत पराक्रम करणारी मर्दानी; पुरूष क्रिकेटपटू आसपासही नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2023 10:12 AM

Open in App
1 / 5

नेदरलँड्सने वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत गुरुवारी स्कॉटलंडवर रोमहर्षक विजयाची नोंद केली अन् भारताचे तिकीट पक्के केले. स्कॉटलंडने विजयासाठी ठेवलेले २७८ धावांचे लक्ष्य नेदरलँड्सला ४४ षटकांच्या आत पार करायचे होते आणि बॅस डे लीडच्या शतकाने ते शक्य झाले. नेदरलँड्सने ४२.५ षटकांत ४ विकेट्स राखून विजय मिळवला.

2 / 5

बॅस डे लीडने सहाव्या विकेटसाठी साकिब जुल्फिकारसह शतकी भागीदारी केली आणि ऐतिहासिक विजय मिळवला. बॅस डे लीडने या सामन्यात ५ विकेट्स घेतल्या अन् शतकही झळकावले. क्रिकेट इतिहासात असा पराक्रम करणारा तो जगातील पाचवा फलंदाज ठरला. लीडने ५२ धावांत ५ विकेट्स व ११८ धावांची खेळी केली.

3 / 5

रोहन मुस्ताफा ( १०९ व ५-२५ वि. PNG, २०१७ ), पॉल कॉलिंगवूड ( ११२* व ६-२१ वि. बांगलादेश, २००५ ) आणि व्हिव्ह रिचर्ड्स ( ११९ व ५-४१ वि. न्यूझीलंड, १९८७ ) यांनी असा पराक्रम केला आहे. पण, या ५ खेळाडूंमध्ये एकमेव महिला खेळाडू आहे अन् तिने शतक नव्हे तर द्विशतक झळकावले होते.

4 / 5

महिला प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या एमिलिया केरने नोंदवलेला हा विक्रम एकाही पुरुष फलंदाजाला जमलेला नाही. न्यूझीलंडच्या अष्टपैलू खेळाडूने २०१९ मध्ये आयर्लंडविरुद्ध १४५ चेंडूंत ३१ चौकार व २ षटकारांच्या मदतीने नाबाद २३२ धावा चोपलेल्या आणि ७-२-१७-५ अशी अप्रतिम स्पेल टाकलेली.

5 / 5

वन डे क्रिकेटमध्ये ( पुरुष व महिला) सर्वात कमी वयात द्विशतक झळकावण्याचा विक्रम एमिलियाच्या नावावर नोंदवला गेला. तिने १७ वर्ष व २४३ दिवसांची असताना ही द्विशतकीय खेळी केली. ऑस्ट्रेलियाची बेलिंडा क्लार्क हिच्यानंतर वन डेमध्ये द्विशतक करणारी ती दुसरी महिला फलंदाज आहे.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपन्यूझीलंड
Open in App