Join us  

सट्टेबाजीमध्ये कसा अडकला शकिब अल हसन, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 4:42 PM

Open in App
1 / 8

शकिब हा सध्याच्या घडीला बांगलादेशचा अनुभवी क्रिकेटपटू आहे. त्याचबरोबर क्रिकेट विश्वामध्ये शकिबने एक गुणवान अष्टपैलू खेळाडू म्हणून नाव कमावले आहे. मैदानातही शकिबची कामगिरी दमदार होत होती.

2 / 8

शकिब हा 2017 आणि 2018 या कालावधीमध्ये एका सट्टेबाजाच्या संपर्कात होता.

3 / 8

त्यावेळी शकिब आयपीएल खेळत होता आणि सनरायझर्स हैदराबाद संघात होता.

4 / 8

शकिबकडून सट्टेबाजाने संघातील बैठकीमध्ये नेमके काय घडते, याबाबतची माहिती मागवण्याचे समोर आले आहे.

5 / 8

शकिब हा भारताच्या दीपक अगरवाल नावाच्या सट्टेबाताच्या संपर्कात होता. या दोघांमध्ये अनेकदा संभाषण आणि चॅटींग झाल्याचे पुरावे आहेत.

6 / 8

शकिबनेही ही गोष्ट मान्य केली असल्यामुळे क्रिकेट जगताबरोबर आयपीएलसाठी हा मोठा धक्का आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आयपीएलला बट्टा लागल्याचे चाहते म्हणत आहेत.

7 / 8

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी शकिबबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे.

8 / 8

फिक्सिंगची ऑफर असल्याची माहिती शकिबनं आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली नाही. जानेवारी 2018मध्ये तिरंगी मालिके दरम्यान हा प्रकार घडला होता. शिवाय यापूर्वी एप्रिल 2018मध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातील सामन्यातही त्याला फिक्सिंगची ऑफर होती. तिही त्यानं आयसीसीला दिली नाही.

टॅग्स :बांगलादेश