SRH च्या पराभवानंतर काव्या मारन रडली; आता संघातील 'या' खेळाडूंची होणार गच्छंती...

ipl : काव्या मारन आपल्या संघातील अनेक खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवणार असल्याची चर्चा सुरु आहे.

आयपीएल स्पर्धेत जेतेपद मिळवण्याचे सनरायझर्स हैदराबादचे (SRH) स्वप्न भंगले. या स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सने तिसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरलं आहे. सनरायझर्स हैदराबादच्या पराभवानंतर संघाची मालकीन काव्या मारन हिच्या डोळ्यातील अश्रू स्पष्ट दिसत होते.

आता सनरायझर्स हैदराबादमधील अनेक खेळाडूंची गच्छंती होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. काव्या मारन आपल्या संघातील अनेक खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवणार असल्याची चर्चा सुरु आहे.

दरम्यान, अशा चर्चा सुरु असल्या तरी आता पुढील आयपीएलपूर्वी मेगा लिलाव होणार आहे. ज्यामध्ये केवळ सनरायझर्स हैदराबादमधीलच तर सर्व संघांना त्यांचे बहुतांश खेळाडू सोडावे लागणार आहेत. म्हणजे कायम ठेवल्या जाणाऱ्या खेळाडूंची संख्या मोजकीच असणार आहे.

सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या गेल्या 3-4 हंगामांच्या तुलनेत या हंगामात चांगली कामगिरी केली. सनरायझर्स हैदराबाद आयपीएलमध्ये उपविजेते ठरले. जरी विजेतेपदाची निराशा झाली असली तरी, काव्या मारनलाही तिच्या संघाचा अभिमान वाटेल. कारण तिच्या संघ अंतिम सामन्यात खेळला.

आयपीएल 2025 साठी आता काव्या मारन या सनरायझर्स हैदराबादची रणनीती बनवण्यास सुरुवात करतील आणि त्यासाठी खेळाडूंना कायम ठेवण्यापासून आणि सोडण्यापासून सुरुवात होईल.

आता एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, जर खेळाडू सनरायझर्स हैदराबाद संघातून बाहेर पडले तर ते आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यातील पराभवाचा परिणाम म्हणून नाही, तर आयपीएल 2025 च्या मेगा लिलाव लक्षात घेऊन बाहेर पडणार असल्याचे दिसून येईल.

दरम्यान, आयपीएल 2025 च्या मेगा लिलावासाठी सनरायझर्स हैदराबाद कोणते खेळाडू सोडू शकतो हा मोठा प्रश्न आहे. अशा खेळाडूंमध्ये पहिले नाव अब्दुल समदचे असेल, ज्यांच्यावर काव्या मारन यांनी खूप गुंतवणूक केली परंतु त्यांना समान परतावा मिळाला नाही.

याशिवाय सनरायझर्स हैदराबाद मयंक अग्रवाल, वॉशिंग्टन सुंदर, आकाशदीप, जयदेव उनाडकट, अनमोलप्रीत सिंग या खेळाडूंनाही सोडू शकतो. परदेशी खेळाडूंमध्ये पॅट कमिन्स बाहेर असू शकतो. कारण पुढील फायनलमध्ये त्याच्या खेळण्याबाबत साशंकता आहे.

ट्रॅव्हिस हेडचीही अशीच परिस्थिती असेल. या व्यतिरिक्त सनरायझर्स हैदराबाद मार्को जॅन्सन, ग्लेन फिलिप्स, एडन मार्कराम यांना देखील सोडू शकते. याशिवाय, सनरायझर्स हैदराबाद ज्या खेळाडूंना आयपीएल 2025 साठी कायम ठेवू शकते, त्यात अभिषेक शर्मा, भुवनेश्वर कुमार आणि हेनरिक क्लासेन यांची नावे असू शकतात.