IPL 2025: SRHची काव्या मारन 'या' व्यक्तीला करतेय डेट? आहे बॉलिवूडचा सर्वात महागडा संगीतकार

Kavya Maran Dating, SRH IPL 2025: 'नॅशनल क्रश' असलेल्या काव्या मारन बाबत जाणून घेण्यास फॅन्स कायमच उत्सुक असतात

Kavya Maran Dating, SRH IPL 2025: जेव्हा जेव्हा आयपीएल सुरू होते तेव्हा सनरायझर्स हैदराबादच्या मालकीण काव्या मारनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. ती नेहमीच तिच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये जाते.

काव्या मारन 'नॅशनल क्रश' असल्याने तिचा चाहता वर्ग तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यास कायमच उत्सुक असतात. तिचे डेटिंग आणि लव्ह लाईफ देखील अनेकदा प्रसिद्धीझोतात येते.

काव्या मारन ही आयपीएलमधील सर्वाधिक चर्चेत असलेली व्यक्ती असते. पण स्वत: आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत काव्या कधीच बोलताना दिसत नाही. पण सध्या तिच्याबद्दल चर्चा सुरु आहे.

काव्या मारनचे नाव काही काळापूर्वी दक्षिण चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदर याच्याशी जोडले गेले होते. अनिरुद्ध हा संगीत जगातातील एक लोकप्रिय आणि नामांकित नाव आहे.

अनिरुद्ध रविचंदर याच्या टीमने मात्र काव्या मारनसोबत असलेल्या या डेटिंगच्या बातम्यांना पूर्णपणे नाकारले आहे. अशाप्रकारच्या सर्व बातम्या म्हणजे अफवा असल्याचे त्याच्या टीमने म्हटले आहे.

अनिरुद्ध रविचंदर आणि काव्या मारन फक्त चांगले मित्र आहेत असे त्याच्या टीमने स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे या दोघांच्या डेटिंगची जी चर्चा सुरु आहे, त्यात तथ्य नसल्याचे सांगण्यात आले आहे.

शाहरुखच्या 'जवान' चित्रपटातून त्याने बॉलिवूड डेब्यू केलेय, ज्यासाठी त्याने १० कोटींचे मानधन घेतले होते. त्यासोबतच तो 'भारतातील सर्वात महागडा संगीतकार' देखील बनला.

अनिरुद्ध 'व्हाय दिस कोलावेरी दी' या सुपरहिट गाण्याचा संगीतकार आहे. IPL 2025 मधील उद्घाटन सोहळ्यात देखील अनिरुद्ध रविचंदर हजर होता. त्याने स्टेजवर गाण्याचा उत्तम परफॉरमन्स देत साऱ्यांची मनं जिंकली.