Join us  

SBI बँकेतील लिपिकाच्या मुलाची क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी, २५ चेंडूंत कुटल्या १०६ धावा, ८ धावांनी हुकलं द्विशतक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2021 2:52 PM

Open in App
1 / 7

विजय हजारे ट्रॉफी ( Vijay Hazare Trophy 2021) स्पर्धेत फलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. कर्नाटकचा फलंदाज रविकुमार समर्थ ( Ravikumar Samarth) यानं सोमवारी केरळच्या गोलंदाजांची धुलाई केली.

2 / 7

कर्नाटकचा कर्णधार समर्थनं प्रथम फलंदाजी करताना देवदत्त पडिक्कलसह पहिल्या विकेटसाठी २४९ धावांची भागीदारी केली आणि संघानं ५० षटकांत ३ बाद ३३८ धावांचा डोंगर उभा केला.

3 / 7

समर्थचे वडील स्टेट बँक ऑफ इंडिया ( SBI) बँकेत काम करतात आणि मुलाच्या खेळीनं त्यांना अभिमान वाटत आहे. विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व सामन्यात त्यानं १५८ चेंडूंत नाबाद १९२ धावा चोपल्या.

4 / 7

रविकुमार समर्थनं केरळच्या गोलंदाजांची धुलाई केलं. त्यानं १२२च्या स्ट्राईक रेटनं फटकेबाजी करताना. त्याच्या १९२ धावांच्या खेळीत १०६ धावा या चौकार षटकारानं आल्या. त्यानं २२ चौकार व ३ षटकार खेचून २५ चेंडूंत १०६ धावा कुटल्या.

5 / 7

विजय हजारे ट्रॉफी २०२१च्या मोसमात ६००+ धावा करणारा रविकुमार समर्थ हा दुसरा फलंदाज ठरला. त्यानं ६ डावांत ६०५ धावा केल्या आणि त्यात ३ शतक व २ अर्धशतकांचा समावेश आहे.

6 / 7

यंदाच्या विजय हजारे ट्रॉफी २०२१च्या पर्वात सर्वोत्तम वैयक्तिक खेळी करणाऱ्या फलंदाजांत रविकुमार तिसऱ्या स्थानी आहे. मुंबईचा पृथ्वी शॉ नाबाद २२७ धावांसह ( १५२ चेंडू वि. पुदुच्चेरी) आणि वेंकटेश अय्यर १९८ धावांसह ( १४६ चेंडू वि. पंजाब) अनुक्रमे पहिल्या व तिसऱ्या क्रमांकावर आहे.

7 / 7

रविकुमार समर्थनं ६६ प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांत ४१७१ धावा केल्या आहेत आणि त्यात १० शतकं व २१ अर्धशतकांचा समावेश आहे. ३७ लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्यानं १५८१ धावा केल्या आहेत.

टॅग्स :विजय हजारे करंडककर्नाटककेरळ