टीम इंडियाविरुद्ध टेस्टमध्ये दहाव्या विकेटसाठी बेस्ट इनिंग खेळणाऱ्या १० जोड्या, इथं पाहा खास रेकॉर्ड

टीम इंडियाविरुद्ध दहाव्या विकेटसाठी इंग्लंडच्या जोडीनं केलीये विक्रमी भागीदारी

इंग्लंडच्या जो रूटनं जेम्स अँडरसनच्या साथीनं टीम इंडियाविरुद्ध दहाव्या विकेटसाठी १९८ धावांची भागीदारी रचलयाचा रेकॉर्ड आहे. २०१४ मध्ये नॉटिंघम कसोटी सामन्यात या जोडीनं विक्रमी भागीदारी रचली होती.

अमीर इलाही आणि जुल्फिकार अहमद या पाकिस्तानच्या जोडीनं १९५२ मध्ये चेन्नई कसोटीत दहाव्या विकेटसाठी १०४ धावांची भागीदारी केली होती.

१९६२ मध्ये फ्रँक वॉरेल आणि वेस्ली हॉल या वेस्ट इंडिजच्या जोडीनं पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानात रंगलेल्या कसोटी सामन्यात दहाव्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी केली होती.

२००० मध्ये दिल्लीच्या मैदान खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्यात झिम्बाब्वेच्या अँडी फ्लॉवर याने हेन्री ओलांगाच्या साथीनं दहाव्या विकेटसाठी ९७ धावांची भागादारी केल्याचा रेकॉर्ड आहे.

पाकचा माजी कर्णधार इम्रान खान याने तौसीफ अहमदच्या साथीनं टीम इंडियाविरुद्ध दहाव्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी रचली होती.

जस्टिन ग्रीव्ह्स आणि जेडन सील्स या कॅरेबियन जोडीनं २०२५ च्या दौऱ्यातील दिल्ली कसोटीत दहाव्या विकेटसाठी ७९ धावांची भागीदारी रचत टीम इंडियाच्या गोलंदाजांना दमवल्याचे पाहायला मिळाले.

ऑस्ट्रेलियन दिग्गज ॲलन बॉर्डर यांनी डेव गिल्बर्टच्या साथीनं मेलबर्न कसोटी सामन्यात टीम इंडियाविरुद्ध दहाव्या विकेटसाठी ७७ धावांची भागादीरी रचली होती.

१९९७ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या ॲलन डोनाल्ड याने ब्रायन मॅकमिलनच्या साथीनं डरबन कसोटी सामन्यात दहाव्या विकेटसाठी ७४ धावांची दमदार भागीदारी रचली होती.

पॉल एलॉट आणि बॉब विलिस या इंग्लंडच्या जोडीनं १९८२ मधअये लॉर्ड्स कसोटी सामन्यात दहाव्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी केली होती.

१९९३ मध्ये इंग्लंडच्या ग्रीम हीक आणि फिल टफनेल या जोडीनं मुंबईतील वनाखेडेच्या मैदानात दहाव्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केल्याचा रेकॉर्ड आहे.