Join us  

Jasprit Bumrah with Sanjana Ganesan on vacation : वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतून सुट्टी मिळताच पत्नीसोबत भटकायला गेला जसप्रीत बुमराह, See Photo

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 3:18 PM

Open in App
1 / 9

Jasprit Bumrah with Sanjana Ganesan on vacation : भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याला आगामी वेस्ट इंडिज विरुद्धच्या वन डे व ट्वेंटी-२० मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्यावरील वर्कलोड लक्षात घेता त्याची विंडीज मालिकेसाठी संघात निवड करण्यात आलेली नाही. अशात तो पत्नी संजना गणेशनसोबत सुट्टीवर गेला आहे.

2 / 9

जसप्रीत व संजना या दोघांनी सोशल मीडियावर त्यांच्या सुट्टीचे फोटो पोस्ट केले आहेत. यात जसप्रीत व्हाईट टी-शर्ट घातलेला दिसत आहे. सिम्पल लूकमध्येही जसप्रीत हँडसम दिसतोय.

3 / 9

जसप्रीत आयपीएलच्या १५व्या पर्वासाठी उत्सुक आहे आणि मुंबई इंडियन्सनं त्याला रिटेन केलं आहे.

4 / 9

नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी व वन डे मालिकेत बुमराहकडे उप कर्णधाराची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानं कसोटीत १२, तर वन डेत ५ विकेट्स घेतल्या.

5 / 9

जसप्रीत आणि संजना यांनी १५ मार्च २०२१मध्ये मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत गोव्यात लग्न केलं. ''प्रेम, जर ते योग्य असेल, तर आपल्याला योग्य मार्ग दाखवतं, आम्ही दोघं नवीन प्रवास सुरू करत आहोत. आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा आहे आणि या नव्या प्रवासाच्या बातमी तुमच्यासोबत वाटताना आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. हा आनंद तुमच्याशिवाय अपूर्ण आहे,'' असे जसप्रीत बुमराहनं लिहिलं होतं.

6 / 9

संजना गणेशन मॉडल आणि अँकर आहे. ती स्टार स्पोर्ट्स इंडियासोबत काम करत असून त्यांच्यासाठी तिनं अनेक क्रिकेट, बॅटमिंटन आणि फुटबॉल स्पर्धांचे अँकरींग केले आहे. तिनं 2019च्या पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचेही सूत्रसंचालन केलं होतं. पुणे येथील तिचा जन्म आहे. सिम्बॉससिस इंस्टीट्युटमधून तिनं B. Techचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यात तिने गोल्ड मेडलही पटकावलं आहे. त्यानंतर 2013-14मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरींग केलं.

7 / 9

२०१४ मध्ये झालेल्या मिस इंडिया स्पर्धेच्या अंतिम स्पर्धेत संजनानं प्रवेश केला होता. याशिवाय तिनं Mtv चॅनेलवरील स्प्लिट्स विला या कार्यक्रमात सहभाग घेतला होता आणि दुखापतीमुळे तिला माघार घ्यावी लागली होती. त्यानंर तिनं आयपीएलमध्ये अँकर म्हणून काम सुरू केलं आणि तेथेच जसप्रितसोबत तिची भेट झाली.

8 / 9

9 / 9

टॅग्स :जसप्रित बुमराहसंजना गणेशन
Open in App