Jasprit Bumrah Weds Sanjana Ganesan : जसप्रीत बुमराहची पत्नी 'पुणेकर'; जाणून घ्या कोण आहे संजना गणेशन!

Jasprit Bumrah Sanjana Ganesan Wedding : गोव्यात मोजक्याच नातेवाईकांच्या साक्षीनं जसप्रीतनं स्पोर्ट्स प्रेझेंटर संजना गणेशन ( Sanjana Ganesan) हिच्याशी लग्न केलं.

Jasprit Bumrah Sanjana Ganesan Wedding : भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) सोमवारी ( 15 March in Goa) बोहल्यावर चढला. गोव्यात मोजक्याच नातेवाईकांच्या साक्षीनं जसप्रीतनं स्पोर्ट्स प्रेझेंटर संजना गणेशन ( Sanjana Ganesan) हिच्याशी लग्न केलं.

प्रेम, जर ते योग्य असेल, तर आपल्याला योग्य मार्ग दाखवतं, आम्ही दोघं नवीन प्रवास सुरू करत आहोत. आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा आहे आणि या नव्या प्रवासाच्या बातमी तुमच्यासोबत वाटताना आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. हा आनंद तुमच्याशिवाय अपूरा आहे, असे जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांनी सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट करून लिहिलं.

संजना गणेशन ही मॉडल आणि अँकर आहे. ती स्टार स्पोर्ट्स इंडियासोबत काम करत असून त्यांच्यासाठी तिनं क्रिकेट, बॅटमिंटन आणि फुटबॉल आदी अनेक स्पर्धांचे अँकरींग केले आहे.

तिनं 2019च्या पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचेही सूत्रसंचालन केलं होतं.

पुणे येथील तिचा जन्म आहे. सिम्बॉससिस इंस्टीट्युटमधून तिनं B. Techचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यात तिने गोल्ड मेडलही पटकावलं आहे. त्यानंतर 2013-14मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरींग केलं.

स्टार स्पोर्ट्स वाहिनीसाठी स्पोर्ट्स प्रेझेंटर म्हणून काम करणारी संजना आणि जसप्रीत यांची पहिली भेट इंडियन प्रीमिअर लीग ( IPL) दरम्यान झाली. संजना ही कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) संघाची स्पोर्ट्स अँकर आहे.

आयपीएल दरम्यान झालेल्या भेटीत जसप्रीत व संजना चांगले मित्र झाले आणि हळुहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले.

जानेवारी २०२०मध्ये दोघांनीही 'Naman' या पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती आणि त्यावेळचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

स्पोर्ट्स प्रेझेंटर बनण्यापूर्वी संजनानं २०१२मध्ये 'Femina Style Diva’ फॅशन शो आणि २०२३मध्ये 'Femina Miss India Pune’ यात सहभाग घेतला होता. त्याच वर्षी तिनं Femina Officially Gorgeous Competition' मध्ये सहभाग घेतला.

२८ वर्षीय संजना MTV Splitsvilla 7 मधून टेलेव्हिजनवर पदार्पम केलं होतं, परंतु तिला दुखापतीमुळे ही मालिका सोडावी लागली.