Join us  

कसोटीत 141 वर्षांत प्रथमच घडलं असं!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 1:05 PM

Open in App
1 / 9

इंग्लंडने दुसऱ्या कसोटीत यजमान श्रीलंकेवर मात करून मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. पाचव्या दिवशी इंग्लंडने यजमानांच्या शेवटच्या तीन फलंदाजांना बाद करताना 57 धावांनी विजय मिळवला.

2 / 9

सामन्याच्या पाचव्या दिवशी इंग्लंडने अवघ्या 30 मिनिटांत श्रीलंकेच्या तीन फलंदाजांना माघारी पाठवले.

3 / 9

फिरकीपटू लीच ( 5/83) याने मलिंदा पुष्पकुमार (1) ची विकेट घेत इंग्लंडचा विजय निश्चित केला.

4 / 9

मोईन अलीने लीचला उत्तम साथ देताना 72 धावांत 4 विकेट घेतल्या. 301 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 243 धावांत माघारी परतला.

5 / 9

श्रीलंकेकडून अँजेलो मॅथ्यूज ( 88) आणि दिमुथ करुणारत्ने (57) यांनी अर्धशतकी खेळी केली, तर रोशन सिल्वा ( 37) आणि निरोशन डिकवेला (35) यांनीही संघर्ष दाखवला.

6 / 9

या कसोटीत 40 पैकी 38 विकेट्स या फिरकी गोलंदाजांनी घेतल्या. 141 च्या कसोटी इतिहासात असे प्रथमच घडले आहे. श्रीलंकेच्या जलदगती गोलंदाज सुरंगा लकमलने एक विकेट घेतला, तर एक फलंदाज धावबाद झाला.

7 / 9

इंग्लंडच्या लीच, मोईन अली आणि आदिल रशिद या फिरकीपटूंनी 20पैकी 19 विकेट घेतल्या. कर्णधार जो रुटने 124 धावांची उपयुक्त खेळी केली.

8 / 9

दक्षिण आफ्रिकेतील 2015-16च्या कसोटी विजयानंतर इंग्लंडने परदेशात मिळवलेला हा पहिला कसोटी मालिक विजय आहे.

9 / 9

इंग्लंडने 2001 मध्ये श्रीलंकेत अखेरचा मालिका विजय मिळवला होता. 17 वर्षांनंतर इंग्लंडने श्रीलंकेला त्यांच्याच घरात पराभूत केले.

टॅग्स :इंग्लंडजो रूटश्रीलंका