Ranji Trophy: जय शाह यांचा इशारा पण इशानचा पुन्हा कानाडोळा; BCCI कारवाई करणार?

ishan kishan ranji team: इशान किशनने रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्यास नकार दिला आहे.

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनने रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्यास नकार दिला आहे. यामुळे बीसीसीआयमध्ये नाराजी असून बोर्डाचे सचिव जय शाह यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये न खेळण्यास विरोध करणाऱ्या खेळाडूंना इशारा दिला आहे.

पण तरीदेखील किशनने रणजी ट्रॉफीचा सामना खेळण्यास नकार दिला. दोन दिवसांपूर्वी राजकोटमध्ये बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, सर्व तंदुरूस्त खेळाडूंना रणजी ट्रॉफीमध्ये खेळावे लागेल, कोणतीही गय केली जाणार नाही.

टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनने रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्यास नकार दिला. यावर बीसीसीआय सचिव जय शाह यांनी इशान किशनचे नाव घेत सांगितले की, मी खेळाडूंना वैयक्तिकरित्या पत्र लिहिणार आहे.

असे असताना देखील राजस्थान आणि झारखंडच्या रणजी सामन्यामधूनही इशान किशन गायब आहे. जमशेदपूरमध्ये शुक्रवारपासून हा सामना सुरू झाला आहे. इशान रणजी का खेळत नाही याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमच्या नामकरण समारंभात पत्रकारांशी बोलताना जय शाह म्हणाले की, रणजी ट्रॉफी स्पर्धेसाठी कर्णधार किंवा प्रशिक्षकाने सांगितल्यास खेळाडूला आपल्या राज्याचे प्रतिनिधित्व करावेच लागेल. कोणतेही कारण खपवून घेतले जाणार नाही.

इशान किशनबद्दल बोलायचे तर तो युवा आहे. मी हे फक्त त्याच्याबद्दल बोलतत नाही, हे सर्व खेळाडूंना समानपणे लागू होते. जर खेळाडू तंदुरूस्त असेल तर त्याने देशांतर्गत क्रिकेट खेळायलाच हवे, असेही जय शाहंनी स्पष्ट केले.

जय शाह म्हणाले की, जे रणजी क्रिकेट खेळत नाहीत त्यांना आधीच फोनवरून कळवण्यात आले आहे. मी पत्र देखील लिहीन की, जर तुमचा मुख्य निवडकर्ता, तुमचा प्रशिक्षक आणि तुमचा कर्णधार असे म्हणत असेल तर तुम्हाला लाल चेंडूचे क्रिकेट खेळावे लागेल. कोणतेही कारण चालणार नाही. ही सूचना सर्व युवा आणि तंदुरूस्त खेळाडूंना लागू होते.

खरं तर इशान किशन झारखंडच्या संघाचा भाग आहे. किशन हार्दिक पांड्यासोबत सराव करत आहे पण झारखंडच्या रणजी संघातून खेळण्यास तो तयार नाही. जय शाह यांच्या इशाऱ्यानंतर इशान रणजी सामना खेळेल असे अपेक्षित होते मात्र तसे झाले नाही.

सौरभ तिवारी (कर्णधार), नाझीम सिद्दीकी, आर्यमन सेन, उत्कर्ष सिंग, विराट सिंग, कुमार कुशाग्रा (यष्टीरक्षक), अनुकुल रॉय, शाहबाज नदीम, वरुण आरोन, सौरभ शेखर, आदित्य चंद्रेश सिंग.

जय शाह यांच्या इशाऱ्यानंतरही इशान किशनने रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे बीसीसीआय किशनवर कारवाई करणार का हे पाहण्याजोगे असेल.