IPL Teams and Hotels List, IPL 2022: रॉयल कारभार! Mumbai Indians, CSK, RCB अन् इतर... पाहा मुंबईतील कोणत्या आलिशान हॉटेलमध्ये राहणार कोणता संघ?

सर्व हॉटेल्स अतिशय मोक्याच्या ठिकाणी असून त्यात अनेक सोयीसुविधा आहेत.

Mumbai Indians CSK & RCB, IPL Teams and Hotels List: IPL 2022 चा हंगाम २६ मार्चपासून सुरू होणार आहे. फायनल २९ मे रोजी होणार आहे. कोरोनामुळे ग्रुप स्टेजचे सर्व सामने मुंबई आणि पुण्यातच होणार आहेत. मुंबईतील वानखेडे, ब्रेबोन आणि डी वाय पाटील या तीन स्टेडियममध्ये एकूण ५५ सामने होणार आहेत. तर १५ सामने पुण्यातील एमसीए स्टेडियमवर होणार आहेत.

यंदा IPLमध्ये एकूण १० संघ आहेत. गुजरात टायटन्स (GT) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) पहिल्यांदाच खेळणार आहेत. याशिवाय, चेन्नई सुपर किंग्ज (CSK), कोलकाता नाइट रायडर्स (KKR), मुंबई इंडियन्स (MI), राजस्थान रॉयल्स (RR), रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB), पंजाब किंग्स (PBKS), दिल्ली कॅपिटल्स (DC), सनरायझर्स हैदराबाद (SRH) हे जुने संघ आहेत. या संघांचे IPLसाठी कोणत्या आलिशान हॉटेलमध्ये वास्तव्य असणार आहे पाहूया.

KKR - कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघ मुंबईतील परळ येथील ITC ग्रँड सेंट्रल हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहे. या हॉटेलमध्ये स्पा, फिटनेस सेंटर, इनडोअर पूल अशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत.

Rajasthan Royals - राजस्थान रॉयल्स (RR) संघ सांताक्रूझ (E) परिसरात असलेल्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये थांबणार आहे. हे हॉटेल आंतरराष्ट्रीय स्तरावर बाली, दुबई आणि हाँगकाँग येथेही आहे. हॉटेल मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) जवळ आहे.

SRH - सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघ ITC मराठा हॉटेलमध्ये तळ ठोकणार आहे. हे हॉटेल अंधेरी (पू) मधील मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून फक्त जवळ आहे. मसाज चेअर आणि बटलरची सुविधा या हॉटेलमध्ये सर्वोत्तम असल्याचं म्हटलं जातं.

Gujarat Titans - IPL नवीन संघ असलेला गुजरात टायटन्स (GT) अंधेरी येथे असलेल्या JW मॅरियट हॉटेलमध्ये थांबणार आहे. जुहू बीच, इस्कॉन मंदिर, गोरेगाव फिल्म सिटी आणि संजय गांधी नॅशनल पार्क हे सारं हॉटेलपासून जवळच आहे.

Lucknow Super Giants - लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) हा आयपीएलचा नवीन संघ आहे, जो दक्षिण मुंबईतील ताज विवांता हॉटेलमध्ये थांबणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज वास्तु संग्रहालय संग्रहालय हे हॉटेलपासून फक्त २ किमी अंतरावर आहे. सर्व हॉटेल्सप्रमाणे, येथेही वाय-फाय, स्विमिंग पूल, फिटनेस सेंटर आणि स्पा सारख्या सुविधा आहेत.

Delhi Capitals - दिल्ली कॅपिटल्स (DC) कुलाबा येथील सर्वात प्रसिद्ध ताज पॅलेसमध्ये मुक्काम करणार आहे. हे हॉटेल गेटवे ऑफ इंडियाच्या अगदी जवळ आहे. येथून अरबी समुद्र पाहता येतो. वानखेडे स्टेडियमचे अंतर येथून खूपच कमी आहे.

RCB - रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) संघ वांद्रे येथील ताज लँड्स एंड येथे थांबणार आहे. हे हॉटेल उपनगरांची राणी (Queen of Suburbs) म्हणूनही ओळखले जाते. हे हॉटेल समुद्रापासून फक्त 200 मीटर अंतरावर आहे. हॉटेलमधून अरबी समुद्र आणि वांद्रे वरळी सी लिंकचे विहंगम दृश्य दिसते.

Punjab Kings- पंजाब किंग्ज (PBKS) संघ मुंबईतील पवई येथील रेनेसान्स हॉटेलमध्ये तळ ठोकणार आहे. हे हॉटेल छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळापासून फक्त साडेचार किमी अंतरावर आहे. या हॉटेलात मोठा पूल, स्पा आणि फिटनेस सेंटर आहे.

CSK- चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघ नरिमन पॉइंटसारख्या पॉश भागात असलेल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये राहणार आहे. या ३५ मजली हॉटेलमधून समुद्राचे विहंगम दृश्य दिसते. येथून वानखेडे स्टेडियमचे अंतर खूपच कमी आहे. ट्रायडेंट हे सर्वात जुन्या 5 स्टार हॉटेल्सपैकी एक आहे.

Mumbai Indians - मुंबई इंडियन्स (MI) संघ ट्रायडंट बीकेसी हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहे. हे हॉटेल वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मध्ये आहे. BKC हे मुंबईचे बिझनेस हब मानले जाते. या हॉटेलमध्ये स्पा आणि फिटनेस सेंटर देखील आहे.