IPL mega auction 2022: ऑक्शन राहिलं बाजूला, काव्या मारनचीच Social Media वर चर्चा, पाहा कोण आहे ती?

ऑक्शनच्या पहिल्या दिवशी सनरायझर्स हैदराबादच्या काव्या मारनची सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती.

IPL mega auction 2022: १२ फेब्रुवारी रोजी इंडियन प्रिमिअर लीग (IPL) २०२२ च्या मेगा ऑक्शनचा पहिला दिवस पार पडला. पहिल्या दिवशी पंजाब किंग्सची मालक प्रिती झिंटा ही उपस्थित नव्हती. पण यावेळी सनरायझर्स हैदराबादच्या काव्या मारनची सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती.

काव्या मारन मेगा ऑक्शनदरम्यान हैदराबादच्या टीमच्या स्टाफ आणि कोच यांच्यासोबत उपस्थित होते. काव्या मारन ही सनरायझर्स हैदराबाद संघाचे मालक कलानिधी मारन यांची कन्या आहे. ती सध्या टीममध्ये रणनितीकार म्हणून काम पाहत आहे.

ही पहिलीच वेळ नाही, जेव्हा काव्या मेगा ऑक्शनमध्ये उपस्थित होती. यापूर्वीही ती टुर्नामेंटदरम्यान आपल्या टीमला चिअर करतानाही दिसली आहे.

आयपीएल ऑक्शनदरम्यान काव्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर फॅन्सनं तिचे फोटो लाईक्स आणि शेअर केले. ऑक्शनपूर्वी प्रिती झिंटा येणार नसल्याची माहिती समोर आल्यानंतर एका युझरनं लिहिलं की 'आता कोणी हार्ट अॅटक देऊ नका की काव्या मारनही येत नाहीये.' तर एकानं फोटो शेअर करत लिहिलं काव्या मारन इज बॅक.

काव्या मारननं चेन्नईतील स्टेला मारिस कॉलेजमधून आपलं पदवीचं शिक्षण घेतलं आहे. यानंतर तिनं न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीशी संलग्न लियोनार्ड एन स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए केलं. आता ती सध्या आपल्या वडिलांसोबत व्यवसाय पाहत आहे.

काव्या मारनचे वडिल कलानिधी मारन हे दक्षिण भारतातील सर्वात मोठं टीव्ही नेटवर्क सन टीव्हीचे मालक आहेत. काव्याची आई कावेरी मारनदेखील सनरायझर्स हैदराबादसोबत जोडल्या आहेत. त्या भारतात सर्वाधिक सॅलरी घेणाऱ्या बिझनेसवुमन्सपैकी एक आहेत.

काव्याचा जन्म ६ ऑगस्ट १९९२ रोजी चेन्नईमध्ये झाला. शिक्षणानंतर लगेच ती आपल्या वडिलांसोबत व्यवसायात उतरली नाही. तिनं सुरूवातीला सन टीव्हीमध्ये इंटर्नशिप केली. त्यानंतर तिनं काम सांभाळलं आणि आता ती डिजिटल प्लॅटफॉर्म Sun NXT ची प्रमुखही आहे.

काव्याशिवाय या मेगा ऑक्शनमध्ये अभिनेता आणि कोलकाना नाईट रायडर्सचा मालक शाहरुख खान याची मुलगी सुहाना खान आणि मुलगा आर्यन खानदेखील उपस्थित होता. याशिवाय जुही चावलाची मुलगी जान्हवी मेहतादेखील उपस्थित होती.