बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती

IPL Auction 2026 Update: आयपीएल २०२६ साठी आज अबु धाबी येथे खेळाडूंचा लिलाव झाला. या लिलावामध्ये काही खेळाडूंवर अक्षरश पैशांचा पाऊस पडला. यात कॅमरून ग्रीन, मथीशा पथिराना यांसारख्या काही परदेशी खेळाडूंवर रेकॉर्डब्रेक बोली लागल्या. तर भारतीय क्रिकेटमधील काही अनकॅप्ड खेळाडूंनीही आपलं लक्ष वेधून घेतलं. काही खेळाडूंची बेस प्राईस अवघी ३० लाख असतानाही त्यांच्यासाठी फ्राँचायझींना पाण्यासारखा पैसा खर्च केला.

आयपीएल २०२६ साठी आज अबु धाबी येथे खेळाडूंचा लिलाव झाला. या लिलावामध्ये काही खेळाडूंवर अक्षरश पैशांचा पाऊस पडला. यात कॅमरून ग्रीन, मथीशा पथिराना यांसारख्या काही परदेशी खेळाडूंवर रेकॉर्डब्रेक बोली लागल्या. तर भारतीय क्रिकेटमधील काही अनकॅप्ड खेळाडूंनीही आपलं लक्ष वेधून घेतलं. काही खेळाडूंची बेस प्राईस अवघी ३० लाख असतानाही त्यांच्यासाठी फ्राँचायझींना पाण्यासारखा पैसा खर्च केला.

अगदी कालपरवापर्यंत फारसे चर्चेत नसलेले हे खेळाडू आयपीएलच्या लिलावात पडलेल्या पैशांचा पावसामुळे चर्चेत आले आहेत. या खेळाडूंपैकी ५ प्रमुख खेळाडू खालीलप्रमाणे.

प्रशांत वीर याची बेस प्राईस अवघी ३० लाख होती. मात्र चेन्नई सुपर किंग्सने त्याला तब्बल १४ कोटी २० लाख रुपयांना खरेदी केलं.

कार्तिश शर्मा याची बेस प्राईस ३० लाख रुपये होती. त्यालाही चेन्नई सुपरकिंग्सने तब्बल १४ कोटी २० लाख रुपयांना खरेदी केले.

आकिब नबी डारची बेस प्राईस अवघी ३० लाख रुपये होती. त्याला दिल्ली कॅपिटल्सने ८ कोटी ४० लाख रुपयांना खरेदी केले.

मंगेश यादव याची बेस प्राईससुद्धा ३० लाख होती. मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्याला तब्बल ५ कोटी २० लाख रुपयांना खरेदी केलं.

तेजस्वी सिंह याची बेस प्राईज ३० लाख रुपये होती. त्याला कोलकाता नाईटरायडर्सने ३ कोटी रुपयांना खरेदी केले.