Join us  

IPL Auction 2021 : ख्रिस मॉरिसला १६.२५ कोटी, तरीही सर्वाधिक पगार घेणाऱ्या खेळाडूंमध्ये दुसऱ्या स्थानी

By स्वदेश घाणेकर | Published: February 19, 2021 10:39 AM

Open in App
1 / 13

IPL Auction 2021 : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League 2021) १४व्या पर्वाच्या लिलावात ख्रिस मॉरिस ( Chris Morris) हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. राजस्थान रॉयल्सनं ( Rajasthan Royals) त्याला १६.२५ कोटींत आपल्या ताफ्यात घेतले. त्यानंतर कायले जेमिन्सन ( Kyle Jamieson), ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell), झाय रिचर्डसन ( Jhye Richardson) आणि कृष्णप्पा गौथम ( K Gowtham) यांच्यावर सर्वाधिक बोली लागली.

2 / 13

आज झालेल्या आयपीएलमध्ये ५७ खेळाडूंसाठी ८ फ्रँचायझींनी १४५.३ कोटी रुपये मोजले. २२ परदेशी खेळाडूंवर यशस्वी बोली लागली. रिली मेरेडीथ ( Riley Meredith) यानं सर्वात महागड्या परदेशी अनकॅप खेळाडूचा मान पटकावला. पंजाब किंग्सनं ( Punjab Kings) त्याच्यासाठी ८ कोटी मोजले.

3 / 13

कृष्णप्पा गौतम हा भारताकडून सर्वात महागडा खेळाडू ठरला. चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) त्याच्यासाठी ९.२५ कोटी मोजले. केदार जाधव व हरभजन सिंग हे पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिले, परंतु दुसऱ्या फेरीत त्यांना अनुक्रमे सनरायझर्स हैदराबाद व कोलकाता नाइट रायडर्स यांनी आपल्या ताफ्यात घेतले.

4 / 13

ख्रिस मॉरीसनं १६.२५ कोटी रुपये घेताच युवराज सिंगचा ( Yuvraj Singh) १६ कोटींचा विक्रम मोडला. आता आयपीएलच्या इतिहासात सर्वात महागडा खेळाडू म्हणून मॉरिस ओळखला जाईल. पण, आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक पगार घेणाऱ्या खेळाडूंमध्ये तो दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानी कोण, चला जाणून घेऊया

5 / 13

झाय रिचर्डसन ( Jhye Richardson - १४ कोटी ( पंजाब किंग्स (PBKS) - ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज झाय रिचर्डसन ( Jhye Richardson ) याच्यासाठी १४ कोटी मोजल्यानं सर्वांच्या भूवया उंचावल्या. ऑस्ट्रेलियाच्या २४ वर्षीय गोलंदाजासाठी एवढी तगडी रक्कम का, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. पण, त्यानं नुकत्याच पार पडलेल्या बिग बॅश लीगमध्ये २९ विकेट्स घेत साऱ्यांचे लक्ष वेधले होते. फेब्रुवारी २०१७मध्ये त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि आतापर्यंत त्यानं २ कसोटी, १२ वन डे व ९ ट्वेंटी-20 सामन्यांत ३९ विकेट्स घेतल्या आहेत.

6 / 13

ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell - १४.२५ कोटी (RCB) - मागील मोसमात फ्लॉप ठरूनही ग्लेन मॅक्सवेलसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं १४.२५ कोटी मोजले. ग्लेन मॅक्सवेलची ऑक्शनमधील कामगिरी - २०१३ - १ कोटी - मुंबई इंडियन्स, २०१४ - ६ कोटी - पंजाब किंग्स, २०१८ - ९ कोटी - दिल्ली कॅपिटल्स, २०२०- १०.७५ कोटी - पंजाब किंग्स, २०२१ - १४.२५ कोटी - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

7 / 13

रिषभ पंत ( Rishabh Pant - १५ कोटी (DC) - दिल्ली कॅपिटल्सचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंतनं आपल्या आक्रमक फटकेबाजीनं स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. DC कडून यंदा त्याला १५ कोटी पगार मिळणार आहे.

8 / 13

रोहित शर्मा ( Rohit Sharma - १५ कोटी (MI) - आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्मा याला मुंबई इंडियन्स १५ कोटी इतका पगार देते.

9 / 13

महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni - १५ कोटी (CSK) - चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार आणि आयपीएलमध्ये १०० विजय मिळवणारा एकमेव कर्णधार महेंद्रसिंग धोनी १५ कोटी पगार घेतो.

10 / 13

कायले जेमिइसन ( Kyle Jamieson - १५ कोटी (RCB) - इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League) १४व्या पर्वात परदेशी खेळाडूंनी कोटींची उड्डाणं घेतली. ६ फुट ८ इंच उंचीचा न्यूझीलंडचा गोलंदाज कायले जेमिइसन याच्यासमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी गुडघे टेकले होते. त्यात फलंदाजीतही त्यानं दमदार कामगिरी करून न्यूझीलंडच्या विजयात हातभार लावला.

11 / 13

पॅट कमिन्स ( Pat Cummins - १५.५ कोटी (KKR) - कोलकाता नाईट रायडर्सनं मागील ऑक्शनमध्ये ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजासाठी सर्वाधिक १५.५ कोटी मोजले. कमिन्सला त्या तुलनेत साजेशी कामगिरी करता आली नाही.

12 / 13

ख्रिस मॉरिस ( Chris Morris - १६.२५ कोटी (RR) - इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूचा मान दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिसनं ( Chris Morris) पटकावला. राजस्थान रॉयल्सनं त्याला १६.२५ कोटींत खरेदी केलं.

13 / 13

विराट कोहली ( Virat Kohli - १७ कोटी (RCB) - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली हा आयपीएलमध्ये सर्वाधिक पगार घेणारा खेळाडू आहे. त्याला १७ कोटी इतका पगार मिळतो.

टॅग्स :आयपीएल लिलावआयपीएल २०२१ मिनी ऑक्शनविराट कोहलीरिषभ पंतमहेंद्रसिंग धोनीरोहित शर्माग्लेन मॅक्सवेल