IPL 2026 Auction : एका भारतीयासह 'या' ४ खेळाडूंवर मिनी लिलावात लागू शकते सर्वात मोठी बोली

अबूधाबी येथे होणाऱ्या लिलावात कोणत्या खेळाडूंवर पैशांची बरसात होणार? हा विषय सध्याच्या चर्चेत आहे.

IPL 2026 च्या हंगामासाठी १६ डिसेंबरला मिनी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. अबूधाबी येथे होणाऱ्या लिलावात कोणत्या खेळाडूंवर पैशांची बरसात होणार? हा विषय सध्याच्या चर्चेत आहे.

इथं एक नजर टाकुयात IPL २०२६ साठी होणाऱ्या मिनी लिलावात सर्वाधिक भाव मिळेल, अशा संभाव्य खेळाडूंच्या यादीतील ४ चेहऱ्यांवर

ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यातील कॅमरून ग्रीन याने आयपीएलमध्ये खास छाप सोडली आहे. बॅटिंग आणि बॉलिंग दोन्हीच्या जोरावर सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता असणारा हा खेळाडूवर मिनी लिलावात मोठी बोली लागल्याचे पाहायल मिळू शकते. IPL नियमानुसार, परदेशी खेळाडूंना १८ कोटींपेक्षा अधिक रक्कम मिळणार नाही. पण हा खेळाडू त्यातही सर्वात महागडा खेळाडू ठरू शकतो.

२०२३ मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने कॅमरून ग्रीनसाठी १७. ५० कोटी रुपये मोजले होते. याच किंमतीसह MI नं ट्रेड विंडोच्या माध्यमातून त्याला RCB च्या संघात धाडले होते.

मिनी लिलावात सर्वात महागड्या खेळाडूंच्या यादीत भारताच्या व्यंकटेश अय्यरचे नावही पाहायला मिळू शकते. व्यंकटेश अय्यर हा IPL च्या इतिहासातील चौथा सर्वात महागडा खेळाडू आहे.

IPL च्या मेगा लिलावात KKR च्या संघाने २३.७५ कोटी रुपयांसह आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. बॅटिंग बॉलिंगमध्ये उपयुक्त असल्यामुळे त्याच्यावर मोठी बोली लागू शकते. शाहरुखचा संघ त्याच्यावर पुन्हा मोठा डाव खेळणार का? तेही पाहण्याजोगे असेल.

इंग्लंडच्या लियाम लिविंगस्टोन या परदेशी खेळाडूवरही अनेक फ्रँचायझीच्या नजरा असतील. परदेशी खेळाडूंच्या गटात स्पिन ऑलराउंडरच्या रुपात त्याला चांगला भाव मिळू शकतो.

आरसीबीच्या संघाने रिलीज केल्यावर जगभरातील वेगवेगळ्या टी लीगमध्ये त्याने धमाकेदार कामगिरीसह लक्षवेधून घेतले आहे.

श्रीलंकेचा वानिंदु हसरंगा हा राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातून खेळताना जबरदस्त कामगिरी करून दाखवली होती. मिनी लिलावाआधी त्याला संघाने रिलीज करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजीसह उत्तुंग फटकेबाजी करुन फलंदाजीत सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. त्यामुळेच त्याला संघात घेण्यासाठी फ्रँचायझीमध्ये कमालीची चढाओढ पाहायला मिळू शकते.